Panaji News : भिकारी वाढले, मात्र आकडेवारी कुठे? किनारी भागात वावर जास्त

Panaji News : गोव्याची प्रतिमा मलिन होत असल्याचा स्थानिकांचा दावा
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, राज्यात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. वास्को, पणजी, म्हापसा, मडगाव आदी शहरात तसेच किनारीभागात भिकाऱ्यांचा वावर दिसून येतो. मात्र सरकारकडे भिकाऱ्यांबाबत कुठलेही आकडेवारी किंवा अन्य कोणता तपशील उपलब्ध नाही.

किनारी भागात पर्यटकांसमोर हात पसरणारे अनेक भिकारी दिसतात. या भिकाऱ्यांमुळे गोव्याची प्रतिमा मलिन होते, असे काही स्थानिक सांगतात. मात्र याचा दोष ते सरकारी यंत्रणेला देतात.

स्ट्रीट प्रॉव्हिडंट या बिगरसरकारी संघटनेचे अध्यक्ष डोनाल्ड फर्नांडिस यांनी सांगितले की भिकारी हा देखील माणूस असतो. सरकारने त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय करायला हवी. गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे भिकाऱ्यांसाठी आश्रयागृह नाही. आश्रयागृह उभारून तिथे भिकारी वा बेघरांची सोय करायला हवी.

फर्नांडिस पुढे म्हणाले की, समाज कल्याण खाते आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांकडे राज्यातील भिकाऱ्यांची संख्या आणि इतर माहिती उपलब्ध नाही. तसेच सरकार भिकारी किंवा बेघरांची समस्या सोडवण्यासाठी कसलाच रस घेत नाही.

भीक मागणाऱ्यांवर लक्ष : पोलिस महासंचालक

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना भिकाऱ्यांबाबत विचारले असता, पोलिस भीक मागणाऱ्यांवर लक्ष ठेवून असतात. कुणी भीक मागताना आढळल्यास दंड ठोठावून त्याला सोडले जाते. यापलीकडे पोलिस जास्त काही करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

Panaji
South Goa : मंत्रिपद दिलेले आलेक्‍स सिक्वेरा ठरले अपयशी : प्रयत्‍न अपुरे

खात्याकडे तपशील नाही

महिला आणि बालकल्याण खात्याच्या संचालकांशी संपर्क साधला असता, भिकऱ्यांचा विषय जिल्हाधिकारी हाताळत असल्याचे सांगितले. समाजकल्याण खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला. भिकाऱ्यांबाबत खात्याकडे कुठलीही आकडेवारी वा तपशील उपलब्ध नसल्याचे त्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com