Ayodya Ram Murti : अयोध्‍येतून आणलेल्‍या श्रीराम मूर्तीची पणजीत परशुरामाच्या मूर्तीजवळ पूजा

Ayodya Ram Murti : आयोध्येत सोमवारी झालेल्या श्रीराम मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्यास गोमंतकीय जनतेच्या वतीने उपस्थित ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी हजेरी लावली होती.
Ayodya Ram Murti
Ayodya Ram Murti Dainik Gomantak

Ayodya Ram Murti : पणजी,कारसेवकांच्या अथक प्रयत्नामुळे आणि त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आपण श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्‍याचा दिवस पाहू शकलो.

त्या दिवसाचे सारे श्रेय हे कारसेवकांना आहे, असे मत ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यंनी व्यक्त केले. आयोध्येत सोमवारी झालेल्या श्रीराम मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्यास गोमंतकीय जनतेच्या वतीने उपस्थित ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी हजेरी लावली होती.

अयोध्येतून आणलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची आज गुरुवारी पणजीतील योग सेतूवर उभारलेल्या श्री परशुरामाच्या मूर्तीजवळ त्यांनी पूजा केली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळकर, प्रदीप शेट, दीपक म्हापसेकर, पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष संजीव देसाई, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते. स्वामींनी उपस्थितांना श्रीरामाची प्रतिमा भेट दिली.

ब्रह्मेशानंदाचार्य स्‍वामी म्हणाले, रामाच्या भूमीवरून परशुरामाच्या भूमीवर येताना आपल्याला अतिव आनंद झाला. श्रीराम मूर्तिप्रतिष्ठापनेचा दिवस आम्हाला कारसेवकांमुळे पाहायाला मिळाला. कारसेवक जीवावर उदार होऊन आयोध्येत गेले होते.

सद्‍गुरू ब्रह्मानंद स्वामींनी गोव्याच्या भूमिचे त्यावेळी नेतृत्व केले होते. त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. सांप्रदायाचा विचार त्यांनी केला नाही. हिंदू समाजाचा विचार करून त्यांनी आंदोलनात झोकून दिले होते.

Ayodya Ram Murti
Goa University: गोवा विद्यापीठ वसतीगृहातील खाद्यपदार्थांत सापडल्या अळ्या

श्रीरामाच्या मंदिर उभारण्यासाठीचा लढा ५०० वर्षांपूर्वी सुरू झाला होता. भाजप सरकार, हिंदू संघटना, विविध सांप्रदाय, मंदिरे आणि सामान्य माणूससुद्धा आंदोलनात सहभागी होता. त्या आंदोलनाला यश आल्यानेच आयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले.

- ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com