Canacona News : रात्री फटाक्‍यांची आतषबाजी; पाळोळेचे ग्रामस्‍थ एकवटले

Canacona News : ध्‍वनिप्रदूषणात वाढ ः समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या वाटा केल्‍या बंद
Palolem Beach
Palolem Beach Dainik Gomantak

Canacona News : काणकोण, पाळोळे किनाऱ्यावर रात्री- अपरात्री आतषबाजी करून ध्वनिप्रदूषण केले जात आहे. या प्रकाराविरूद्ध स्थानिक नगरसेवक सायमन रिबेलो यांच्या नेतृत्त्वाखाली पाळोळेवासीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन आवाज उठविला.

यावेळी गोंयकार संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते जॅक फर्नांडिस व अन्य सुमारे दोनशे रहिवासी उपस्थित होते.

येथील भाटकार व जमीनदारांनी आपल्या जमिनी परप्रांतीय व्यावसायिकांना भाडेपट्टीवर दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी या भाडेकरूंकडून किनाऱ्या जाणाऱ्या वाटा गेट घालून बंद करण्यात येतात. याचा परिणाम अन्य अंतर्गत भागातील पर्यटन व्यावसायिकांवर होत आहे.

यासंदर्भात शुक्रवारी आपत्ती शेल्टर हाऊसमध्ये पाळोळे किनारी भागातील पर्यटन व्यावसायिकांची बैठक बोलाविण्यात आली.

या पूर्वी पालिका अभियंत्यांना जे पर्यटक व्यावसायिक किनाऱ्याकडे जाणाऱ्या वाटा बंद करतील, त्यांना पर्यटन परवाना न देण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. जे पर्यटन व्यावसायिक हे निर्बंध पाळणार नाहीत त्यांचा पर्यटन व्यवसायाचा परवाना रद्दबातल करण्यात येणार असल्याचे नगरसेवक सायमन रिबेलो यांनी सांगितले.

यापूर्वी पाळोळे किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची पोलिसांकडून सतावणूक चालू होती. ती बंद करण्यात आल्याचे रिबेलो यांनी सांगितले.

Palolem Beach
Goa Politics: सिक्वेरांना पर्यावरण आणि कायदा खाते

पोलिस प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गोंयकार संघटनेचे अध्यक्ष जॅक फर्नांडिस ध्वनी प्रदूषण व अन्य समस्या संदर्भात पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपजिल्हाधिकारी, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व पोलिस उप अधिक्षक यांना निवेदन दिल्याचे सांगितले.

रात्री-बेरात्री आतषबाजी केल्याने आजारी व्यक्ती,ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची झोपमोड होते. त्यामुळे त्वरित त्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com