Crime News : पाच वर्षांत फक्त ४ आरोपींना शिक्षा; अल्पवयीन लैंगिक अत्याचारप्रकरणे

Crime News : पोलिस तपासातील यश ९७ टक्के २०२१ मध्ये ४९ गुन्ह्यात ४७ जणांना, २०२२ मध्ये ५५ पैकी ५३ गुन्ह्यांतील तर २०२३ मध्ये ६२ पैकी ६१ गुन्ह्यांतील संशयितांना अटक करण्यात आली आहे.
arrest
arrest Dainik Gomantak

Crime News :

पणजी, राज्यात गेल्या ५ वर्षांत (२०१९ ते २०२३) अल्पवयीनांवरील लैं​गिक अत्याचारप्रकरणी २६० गुन्हे नोंद झाले.

त्यापैकी २५२ गुन्ह्यांमध्ये २८५ संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना ९६.९२ टक्के यश आले असले, तरी या काळात न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन फक्त चार आरोपींना शिक्षा झाल्याची माहिती उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये ५१ अल्पवयीन मुलींवरील बलात्कारप्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यात ४९ संशयितांना अटक झाली होती. २०२० मध्ये ४३ पैकी ४२ जणांना अटक झाली.

२०२१ मध्ये ४९ गुन्ह्यात ४७ जणांना, २०२२ मध्ये ५५ पैकी ५३ गुन्ह्यांतील तर २०२३ मध्ये ६२ पैकी ६१ गुन्ह्यांतील संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अजूनही आठ गुन्ह्यांतील संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामध्ये २०२० मधील म्हापसा, कळंगुट व वास्को पोलिस स्थानकातील प्रत्येकी एक, २०२१ मध्ये म्हापशातील दोन गुन्ह्यांतील, २०२२ मध्ये पणजी व म्हापसा पोलिस स्थानकातील प्रत्येकी एक तसेच २०२३ मध्ये जुने गोवे पोलिस स्थानकातील एका गुन्ह्याचा समावेश आहे.

या पाच वर्षाच्या कालावधीत पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपत्रांपैकी चार प्रकरणांमध्ये न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे.

त्यामध्ये मायणा - कुडतरी, कुंकळ्ळी, आगशी व पर्वरी या पोलिस स्थानकातील प्रकरणांचा समावेश आहे.

arrest
Goa Crime News: प्रणव फडते प्राणघातक हल्ला प्रकरण! दोघे अटकेत; म्हापसा पोलिसांची कारवाई

सर्वाधिक २८ गुन्हे म्हापशात

अल्पवयीन मुलींवर राज्यात २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत अत्याचारप्रकरणी सर्वाधिक २८ गुन्हे म्हापशात नोंद झाले आहेत, तर त्यापाठोपाठ पर्वरी पोलिस स्थानकात २४, मायणा - कुडतरी आणि पणजी प्रत्येकी १७,

वेर्णा १६, वास्को १५, डिचोली १४, मडगाव १२ आणि पेडणे प्रत्येकी १२, जुने गोवा, कुंकळ्ळी आणि वाळपई प्रत्येकी ११, फोंडा १०, आगशी ९, कोलवा ७, फातोर्डा, कळंगुट आणि महिला पोलिस स्थानकात प्रत्येकी ६, केपे ५, काणकोण आणि मुरगाव प्रत्येकी ४, हणजूण, साळगाव आणि सांगे प्रत्येकी ३, कोलवाळ, कुडचडे, म्हार्दोळ प्रत्येकी २, तर कुळे १ याचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com