Crime News : प्राणघातक हल्ला करून धारबांदोड्यात एकाला लुटले; दोघांवर गुन्हा

Crime News : गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे दोन व्यक्ती त्यांच्या धावकोण येथील घरात आले आणि त्यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यांनी बचावासाठी प्रयत्न केला; पण तो असफल ठरला. त्यांच्या हाता-पायांना गंभीर इजा झाली आहे.
Crime
CrimeDainik Gomantak

Crime News :

फोंडा, धावकोण-धारबांदोडा येथील देवेंद्र गावकर यांच्यावर गुरुवारी पहाटे अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला.

हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल आणि वीस हजारांची रोख रक्कम घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.

गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे दोन व्यक्ती त्यांच्या धावकोण येथील घरात आले आणि त्यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यांनी बचावासाठी प्रयत्न केला; पण तो असफल ठरला. त्यांच्या हाता-पायांना गंभीर इजा झाली आहे.

Crime
Goa Traffic Police: गोवा पोलिसांनी मद्यपी चालकांना दाखवला 'पोलिसी खाक्या'; 249 गुन्हे दाखल; 2124 प्रकरणे उघडकीस

सध्या त्यांच्यावर फोंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून उद्या गोमेकॉत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. माझ्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल आणि वीस हजारांची रोकड घेऊन हल्लेखोर पळून गेले, असे गावकर म्हणाले.

यासंदर्भात कुळे पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक विभावरी गावकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मारहाणीची तक्रार आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिस संशयितांच्या मागावर

कुळे पोलिसांनी देवेंद्र गावकर यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी भादंसं कलम ४५२, ३२४, ३८०, ५०४ आणि आयपीसी ३४ नुसार कांता बेतकेकर (कणकिरे - गुळेली) आणि महादेव गावडे (नाणूस- उसगाव) यांच्यावर गुन्हा नोंद केला असून पोलिस संशयितांच्या मागावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com