Noise Pollution: ध्वनिप्रदूषण झाल्यास कडक कारवाई; खंडपीठाचे सक्त निर्देश

Goa Noise Pollution: अधिकाऱ्यांना ठेवावी लागणार देखरेख
Noise Pollution
Noise PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Noise Pollution: ओझरांत-हणजूण येथे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे डेस्मंड आल्वारिस यांनी निदर्शनास आणून दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

या परिसरात ८ व ९ डिसेंबरला होणाऱ्या इव्हेंट्सना परवानगी दिली असल्यास पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ व उपजिल्हाधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित राहून देखरेख ठेवावी व उल्लंघन झाल्यास त्वरित म्युझिक सिस्टीम जप्त करून कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यामुळे आयोजकांच्या कर्कश आवाजातील संगीतावर नियंत्रण येणार आहे. पुढील सुनावणी १२ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे.

ओझरांत-हणजूण येथे ८ व ९ डिसेंबर या दिवशी इंडिया बाईक वीक व टीव्हीएस मोटर सोल असे दोन वेगवेगळे इव्हेंट होणार आहेत. त्याचबरोबर येत्या २८ ते ३० डिसेंबर काळात सनबर्न फेस्टिव्हल होणार आहे.

गेल्या आठवड्यात रॉयल इनफिल्ड मोटर इव्हेंट झाला होता. त्यावेळी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाले होते.

Noise Pollution
Goa Crime: रशियन कैद्याचा न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न; ड्रग्ज प्रकरणात झाली होती अटक

...तर इव्हेंट होऊ दिले जाणार नाहीत!

८ व ९ डिसेंबरला होणाऱ्या इव्हेंटसाठी परवानगी देण्यात आली आहे की नाही याची संबंधित यंत्रणेमार्फत चौकशी केली जाईल व परवानगी नसल्यास हे इव्हेंट होऊ दिले जाणार नाही, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने उच्च न्यायालयाला दिली.

जर परवानगी दिली असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी इव्हेंटवेळी उपस्थित राहून देखरेख ठेवावी. डेस्मंड आल्वारिस यांना अधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहायचे असल्यास त्यांना परवानगी देण्यात यावी. २८ ते ३० डिसेंबरदरम्यान फेस्टिव्हल होणार असल्याने त्यासंदर्भात योग्य ते निर्देश १२ डिसेंबरला दिले जातील असे न्यायालयाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com