New Zuari Bridge : झुआरीची कोंडी फुटता फुटेना; वाहनांच्या लांबच लांब रांगा

उद्घाटनानंतर हा पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता.
New Zuari Bridge Traffic
New Zuari Bridge TrafficDainik Gomantak

New Zuari Bridge : झुआरी नदीवरील नवीन पुलाचं काल गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनानंतर हा पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता. मात्र हा पुल अजूनही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसल्याने वाहतुकीची कोंडी आजही पाहायला मिळत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा आगशीपासून ते वेर्णा परिसरापर्यंत लागल्या आहेत.

दरम्यान या पुलावर दुचाकी, रिक्षा आणि हलक्या चारचाकींना प्रवेश प्रतिबंधित असल्याचे फलकही पुलाच्या सुरुवातीलाच लावण्यात आल्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

बहुचर्चित झुआरी नदीवरील नवा केबल स्टेट पूल उद्‍घाटनानंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून खुला केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही घोषणा केली होती. मात्र नवा झुआरी पूल सुरु झाल्यानंतरही पणजी-मडगाव मार्गावरील कोंडी फुटण्याची काही चिन्ह दिसत नाहीत.

New Zuari Bridge Traffic
New Zuari Bridge : झुआरी पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी होणार खुला

उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित असलेल्या झुआरी केबलस्टेड पुलाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते भव्य आतषबाजीत लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार फ्रान्सिस सार्दिन, विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गडकरी यांच्यामुळेच हा प्रकल्प साकार होऊ शकला. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येत आहे. अटलसेतू उद्‌घाटनावेळी त्यांनी ‘हाउ ज द जोश’ असे विचारले होते. ती ऊर्जा घेऊन आम्ही काम करत आहोत.

गेल्या 30 वर्षांत वाहतुकीसंबंधी दक्षिण गोव्यातील सर्वांनी जो त्रास भोगला तो यापुढे होऊ नये. मनोहर विमानतळ कार्गो विमानतळ असल्याने दक्षिण गोव्यातील माल आणण्यासाठी या पुलाचा फायदा होईल. याशिवाय मुरगाव बंदरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी फायदा होईल. यावेळी श्रीपाद नाईक, नीलेश काब्राल यांची भाषणे झाली. यावेळी राज्यातील खड्ड्यांच्या संबंधित सूचना आणि इतर माहिती मिळविणाऱ्या ॲपचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com