Suchana Seth
Suchana SethDainik Gomantak

चार वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात नवी अपडेट; सूचना 19 तास होती मृतदेहासोबत हॉटेल खोलीत

मुलाची हत्या केल्यानंतर तब्बल 19 तास सूचना सेठ मुलाच्या मृतदेहासोबत हॉटेलच्या खोलीत होती असेही तपासातून समोर आले आहे.
Published on

Candolim Murder Case: चार वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणाने गोव्यासह संपूर्ण देश हादरून गेला. या प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली असून, संशयित सूचनाने हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर दोन तासांतच मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

हत्या केल्यानंतर तब्बल 19 तास सूचना सेठ मुलाच्या मृतदेहासोबत हॉटेलच्या खोलीत थांबली होती असेही सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

बंगळुरुतील एका टेक कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठवर आपल्याच चार वर्षीय मुलाची हत्या केल्याचा आरोप असून, ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

या हत्या प्रकरणात सूचनाची कसून चौकशी केली जात आहे. सूचना मुलाची हत्या करण्यापूर्वी देखील गोव्यात येऊन गेली होती, असे यापूर्वी तिच्या चौकशीतून उघड झाले आहे.

दरम्यान, याप्रकरणात आता नवी अपडेट समोर आली असून, सूचना बाळाचे व्यवस्थित संगोपन करण्यासाठी बंगळुरूत एका 'पॅरेंटल थेरपी' सत्रात भाग घेतला होता, अशी माहिती समोर आली आहे.

तसेच, सूचनाने हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर अवघ्या दोनच तासांत मुलाची हत्या केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. त्यानंतर तब्बल 19 तास सूचना मुलाच्या मृतदेहासह हॉटेलच्या खोलीत थांबली होती.

दरम्यान, 07 जानेवारी मध्यरात्री रोजी अचानक तिने रिसेप्शनला टॅक्सी बुक करण्यास सांगितले आणि एका बॅगसह हॉटेलमधून बाहेर पडली. कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये असताना सूचनाला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

मृत मुलाचे शवविच्छेदन केल्यानंतर देखील शवचिकित्सक तज्ञांनी मुलाच्या मृत्यूला 36 तासांपेक्षा जास्त कालावधी झाल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, मुलाच्या शरीरातून रक्तस्त्राव किंवा त्याला इजा झाल्याचे व्रण आढळून आले नसल्याचे सांगितले होते.

गोवा पोलिसांनी सेठच्या 'पॅरेंटल थेरपी' बाबत बेंगळुरूमधील थेरपिस्टकडे देखील चौकशी करण्याची शक्यता आहे. तसेच, तिची लवकरच गोव्यातील मानसोपचार आणि मानवी वर्तणूक संस्थेत मानसोपचार तपासणी केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com