New Zuari Bridge Twin Tower: गोव्याच्या पर्यटनातील नवे आकर्षण; झुआरी पुलाच्या ट्विन टॉवरवर होणार फिरती ऑब्झर्वेटरी

निविदा प्रसिद्ध
New Zuari bridge
New Zuari bridgeDainik Gomantak

New Zuari Bridge Twin Tower: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन आठ पदरी झुआरी पुलावर ट्विन टॉवर आणि फिरणारी ऑब्झर्वेटरी बांधण्यासाठी नवीन निविदा जारी करण्यात आली आहे.

हे बांधकाम बांधा, वापरा, हस्तांतरीत (बीओटी) तत्त्वावर करावयाचे आहे, असे निविदेत नमूद करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

New Zuari bridge
Goa State Tree: गोव्याचा राज्य वृक्ष 'माडत' आहे खास; झाडाच्या बुंध्यात पाणी; तर साल असते अग्निरोधक

हे टॉवर्सचे गोव्याच्या पर्यटनातील नवीन आकर्षण असणार आहे. याआधीही ट्विन टॉवरच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या, मात्र साथीचे आजार आणि इतर कारणांमुळे कंत्राटदार निश्चित होऊ शकला नव्हता.

कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर टॉवर्स आणि फिरत्या ऑब्झर्वेटरीचे डिझाइन अंतिम केले जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी सांगितले होते की टॉवर्सचे डिझाईन जगभरातील इतर कोणत्याही आकर्षणापेक्षा वेगळे असावे.

नवीन झुआरी पुलावरील टॉवर्स पॅरिसमधील आयफेल टॉवरला टक्कर देतील, अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली होती.

New Zuari bridge
State Symbols of Goa: गोव्याचे राज्य प्राणी, फळ, फुल माहिती आहेत? जाणून घ्या राज्याच्या प्रतिकांविषयी...

झुआरीच्या आगाशीच्या बाजूला उत्तर किनाऱ्यावर पुलाच्या खाली पार्किंग असेल. तिथे सध्या पूल बांधकाम कंत्राटदार दिलीप बिल्डकॉनचे कार्यालय आहे.

खालून वर जाण्यासाठी हाय स्पीड लिफ्ट असणार आहे. या टॉवर्समध्ये गोव्याचा इतिहास, वारसा दर्शविणारी गॅलरी उभारण्यात येणार आहे. तसेच टॉवरच्या टॉपवर रेस्टॉरंटचेही नियोजन आहे. प्रत्येक टॉवरमध्ये सुमारे 500 पर्यटक बसू शकतील, अशी अपेक्षा आहे.

ही सर्व माहिती, नवीन झुआरी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com