Navelim Road divider : बेले-नावेली येथील धोकादायक रस्ता विभाजक हटवा : तुयेकर

Navelim Road divider : तुयेकर यांनी मंगळवारी सकाळी बेले-नावेली येथे भेट देऊन तेथील धोकादायक रस्ता विभाजकाची पाहणी केली.
Navelim Road divider
Navelim Road divider Dainik Gomantak

Navelim Road divider : मडगाव, नावेलीचे आमदार व कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी मंगळवारी (ता.९) बेले-नावेली येथील धोकादायक रस्ता विभाजकाची पाहणी करून अपघातास कारणीभूत ठरणारा हा रस्ता विभाजक हटविण्याची सूचना केली.

तुयेकर यांनी मंगळवारी सकाळी बेले-नावेली येथे भेट देऊन तेथील धोकादायक रस्ता विभाजकाची पाहणी केली.

यावेळी नावेलीचे पंच दामोदर चव्हाण व मायकल कार्दोझ, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे साहाय्यक अभियंता अजय गावडे, वाहतूक पोलिस अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ हरीश तुळसकर उपस्थित होते.

Navelim Road divider
Goa Updates 10 January 2024: कांदोळी हत्या प्रकरणासह मंत्रिमंडळ बैठक, विद्यार्थी निवडणूकीचे आजचे अपडेट

रस्ता रुंदीकरणासाठी जमीनमालकाने जागा न दिल्याने बेले-नावेली येथील महामार्गाचा छोटासा पट्टा अरुंद राहिला आहे. या ठिकाणी वाहनांची रस्ता विभाजकाला धडक बसून अपघात घडत आहेत. सोमवारीही या रस्ता विभाजकाला एका कारची धडक बसली.

सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले. या अपघातात रस्ता विभाजक मात्र उखडला आहे. सर्रास अपघात घडत असल्याने हा धोकादायक रस्ता विभाजक हटविण्यात यावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com