Goa News : ‘सीपीडब्ल्यूडी’ने उभारली एनआयटी इमारत; मोदींच्या हस्ते आज उद्‍घाटन

Goa News : ३९०.८३ कोटी रुपये खर्च
National Institute of Technology Goa
National Institute of Technology Goa Dainik Gomantak

Goa News : पणजी, राज्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी) कायमस्वरूपी कॅम्पसचे आज (ता. ६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मडगाव येथील कार्यक्रमातून आभासी पद्धतीने उद्‍घाटन होणार आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. गोव्याला शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळख मिळावी हे त्यांचे स्वप्न होते.

एनआयटी गोवाचे कामकाज २०१० साली गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्मागुढी येथे सुरू झाले होते, परंतु एनआयटीला स्वतःची इमारत मिळावी यासाठी कुंकळ्ळी येथे एनआयटीच्या कायमस्वरूपी इमारत उभारणीसाठी ४,५६,७६७ चौ. मी. (११३ एकर) जमीन हस्तांतरीत करून देण्यात आली.

१५ डिसेंबर २०१८ रोजी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पायाभरणी केली होती.

मे २०१९ मध्ये केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (सीपीडब्ल्यूडी) देखरेख समितीच्या मार्गदर्शनाखाली ४६ एकर जागेत एनआयटी गोवा कॅम्पसच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम सुरू झाले.

National Institute of Technology Goa
PM Modi Goa Visit: दुकाने, मार्केट 6 फेब्रुवारीला बंद; PM मोदींच्या सभेसाठी दक्षिण गोव्यात सुरक्षा वाढवली

कॅम्पसचे बांधकाम ‘आरसीसी प्रिकास्ट त्री-एस’ तंत्रज्ञान वापरून करण्यात आले आहे. कॅम्पसमध्ये एकूण ७०,७५० चौ. मी. क्षेत्रफळाचे बांधकाम झाले असून बांधकामासाठी ३९०.८३ कोटी रु. खर्च आला.

इमारत आवारात सौर ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, पाण्याची बचत करणारी फिटिंग्ज आणि प्रसाधन गृहे, कार्यक्षम विद्युत दिवे आणि सौर ऊर्जेवर चालणारे पथ दिवे यांसारखी पर्यावरणाला अनुकूल अनेक वैशिष्ट्ये आहेत.

बांधकामा दरम्यान राज्यातील हवामानाला अनुकूल सौर पॅनेल बसवण्यात आले असून स्थानिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. विजेचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी इमारतीत खेळती हवा आणि विपुल सूर्यप्रकाश इमारतीत राहील याकडे लक्ष देण्यात आले आहे.

१२६० विद्यार्थ्यांची क्षमता

एनआयटी इमारतीत १,२६० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. या इमारतीत प्रशासकीय विभाग, डिजिटल वाचनालय, परिषद सभागृह, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, कर्मचारी निवासस्थान, क्रीडांगण, तासिका वर्ग आदी इतर विविध सुविधा उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com