कार्निव्हलविषयी महापालिकेची वाहतूक पोलिसांबरोबर आज बैठक

carnival day
carnival day

पणजी:पणजीतील पुढील महिन्यात होणाऱ्या कार्निव्हलच्या आयोजनाविषयी शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी महापालिकेत बैठक आयोजिली असल्याची माहिती उदय मडकईकर यांनी दिली.
मडकईकर म्हणाले की, कार्निव्हलच्या आयोजनासाठी महापालिकेने समिती नेमली आहे.त्यात २१ जणांचा समावेश करण्यात आला आहे.या सर्व समिती सदस्यांना आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपअधीक्षकांना बैठकीस पाचारण करण्यात आले आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्निव्हलमध्ये १८ जून रस्त्यांवर विविध कार्यक्रम असणार आहेत.त्यात कराटे, झुम्बा नृत्य, स्केटिंग, सायकलिंगसारखे मुलांचे खेळही असतील.या रस्त्यावर त्या दिवशी ‘नोमोझो‘ असेल.
आम्ही गतवर्षासाठी ४० लाख रुपये खर्च केला होता.त्यात २० लाख रुपये राज्य सरकारने दिले होते, तर २० लाखांचा निधी महापालिकेने प्रायोजकांच्या माध्यमातून उभारले होते.गतवर्षीपेक्षा यंदाच्या खर्चात नक्कीच वाढ असेल.बांदोडकर मार्गावर जुन्या सचिवालयापासूनच कार्निव्हल मिरवणूक सुरू होणार असून, मागील पर्यटन खात्याच्या बैठकीत आम्ही आमची बाजू मांडली होती.त्यावेळी पोलिसांच्या वाहतूक शाखेच्यावतीने सूचविलेला दुसरा मार्ग आम्हाला पसंत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कार्निव्हलसाठी निवडलेली समिती अशी महापौर उदय मडकईकर चेअरमन, उपमहापौर पाश्‍कालो मास्कारेन्हास सचिव, मिनिनो डिक्रुझ कोषाध्यक्ष, फ्रान्सिस्को मार्टिन्स अध्यक्ष, शुभम चोडणकर उपाध्यक्ष, विठ्ठल चोपडेकर उपाध्यक्ष, टोनी डायस उपाध्यक्ष, ज्योकिम टेलेस उपाध्यक्ष, तिमोतिओ फर्नांडिस, बेंटो लॉरेना, नागेश करिशेट्टी, मेसिएस तावारिस, तोमास माचादो, ॲर्सन टेलेस, एडी जॉर्ज, व्हेलेंट सोरेस (सर्व सल्लागार), शेखर डेगवेकर, सोरया पिंटो माखिजा, पुंडलिक राऊत देसाई, प्रमेय माईणकर, फ्रान्सिस्को नोरोन्हा (सर्व महासचिव).
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com