'गणेशोत्सवापूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल', मुंबई - गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मंत्र्याने दिली खात्री

पनवेल पासून सिंधुदुर्गातील झारापपर्यंत मंत्री चव्हाण यांनी महामार्गाचा पाहणी दौरा केला.
Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwayRavindra Chavan Twitter

Mumbai Goa Highway: गणेशोत्सावापूर्वी मुंबई - गोवा महामार्गाची एक लेन सुरू करण्याचा वायदा महाराष्ट्र सरकारने केला आहे. यासाठी सरकार प्रयत्नशील असून, राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या महामार्गाची आज (मंगळवारी) पाहणी केली.

पनवेल पासून सिंधुदुर्गातील झारापपर्यंत मंत्री चव्हाण यांनी महामार्गाचा पाहणी दौरा केला. महामार्गाच्या सिंगल लेनचे काम गणेशोत्सवापूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल. अशी खात्री मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली.

"आज मुंबई - गोवा महामार्गाचा पाहणी दौरा पार पडला. पनवेल पासून सुरू झालेला हा पाहणी दौरा सिंधुदुर्गातील झाराप येथे पूर्ण झाला. यावेळी मुंबई - गोवा महामार्गाच्या विविध 10 पॅकेजेसची पाहणी करून सुरु असलेल्या कामासंदर्भात माहिती घेतली."

"पनवेल ते इंदापूर या पहिल्या 42 किलोमीटरच्या टप्प्यापैकी 23 किलोमीटरचे सिंगल लेनचे काम पूर्ण झालेले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन मशिनरींच्या सहाय्याने जोमाने सुरू आहे."

"तसेच रस्ते बांधणीच्या कामासाठी नव्या CTB टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून, 09 मीटरच्या असणाऱ्या पेव्हर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम सुरु आहे. पेव्हर मुळे एका दिवसामध्ये जवळपास 900 मीटर काम होत आहे."

Mumbai Goa Highway
Porvorim Accident: पर्वरीत थारने दुचाकीला 100 मीटर नेले फरफटत, दुचाकी चालकाचा मृत्यू

"पेवरच्या माध्यमातून मशीनच्याद्वारे दर दिवशी कमीत कमी 01 कि.मी. आणि जास्तीत जास्त 1.5 कि.मी. काम पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. येणार्‍या दिवसात हा रस्ता जड वाहनांसाठी बंद करून रस्त्याचे काम जलदगतीने करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु आहेत."

"यासाठी पाली, निजामपूर मार्गे वाहतूक वळवण्याबाबत विचार सुरू असून, मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलदगतीने कसं होईल याकडे लक्ष दिलं जातंय. महामार्गाच्या सिंगल लेनचे काम गणेशोत्सवापूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल, अशी खात्री आहे." अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

Mumbai Goa Highway
Panaji Margao Selfie Points: पणजी बसस्थानक आणि मडगाव रेल्वे स्थानकावर 'न्यू इंडिया' सेल्फी पॉइंट

'मुंबई गोवा महामार्गासाठी आता मनसेचा एल्गार...'

मुंबई - गोवा महामार्गावरील खड्यांची समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहे. राजयकीय नेते, स्थानिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवून देखील यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाहीये. पण, मुंबई गोवा महामार्गासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एल्गार... पुकारला आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांचा 16 ऑगस्ट रोजी याप्रकरणी पनवेल येथे निर्धार मेळावा होणार आहे. या सभेत मुंबई गोवा महामार्गाबाबत पक्षाची भुमिका जाहीर केली जाईल असे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com