Morjim News : मोरजाई देवस्थानतर्फे शेतात पारंपरिक नांगरपूजन

Morjim News : पूजन झाल्याशिवाय कोणीही शेतकरी नांगरणी करीत नाहीत. देवस्थान समिती पुढाकार घेऊन जे मानकरी आहेत, त्या मानकऱ्यासोबत पारंपरिक पद्धतीने ज्यांच्या बैलांच्या जोड्या आहेत, त्या बैलांच्या जोड्या घेऊन पुरोहित उदय गाडगीळ यांच्या विधिवत पूजेनंतर नांगरपूजन मोरजीत परिसरात केले जाते.
Morjim
MorjimDainik Gomantak

Morjim News :

मोरजी पंचायत क्षेत्रात श्री देवी मोरजाई देवस्थानतर्फे आजही पारंपारिक उत्सव आणि पारंपरिक विधी केल्या जातात. त्या विधी अखंडितपणे सुरू आहेत. त्यापैकीच एक नांगरपूजन विधी उत्साहात पार पडला.

पूजन झाल्याशिवाय कोणीही शेतकरी नांगरणी करीत नाहीत. देवस्थान समिती पुढाकार घेऊन जे मानकरी आहेत, त्या मानकऱ्यासोबत पारंपरिक पद्धतीने ज्यांच्या बैलांच्या जोड्या आहेत, त्या बैलांच्या जोड्या घेऊन पुरोहित उदय गाडगीळ यांच्या विधिवत पूजेनंतर नांगरपूजन मोरजीत परिसरात केले जाते. प्रथा आजही शेकडो वर्षापासून सुरू आहे. यंदा पूजनानंतर शेतीकामाला सुरवात करण्यात आली.

श्रीदेवी मोरजाई देवस्थान समिती दरवर्षी पुढाकार घेऊन जून महिन्यापूर्वी नांगरपूजन विधी केला जातो. त्या दिवशी पुरोहित उदय गाडगीळ यांच्यामार्फत विधिवत पूजन केल्यानंतर सुरुवातीला पुरोहितच शेत नांगरणी करतो.

Morjim
Goa's Pankaj Narvekar Climbs Mount Everest: ऐतिहासिक! माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पंकज ठरला पहिला गोमन्तकीय

त्यानंतर जे देवस्थानचे मानकरी निवडलेले असतात. त्यांच्यामार्फत नांगरणी केली जाते. ही नांगरणी केल्यानंतर मग मोरजीतील शेतकरी केव्हाही आपली शेती नांगरायला त्यांना कसल्याच प्रकारची हरकत नसते. नांगपूजन करताना पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने बैलांच्या जोडीने नांगरणी केली जाते. त्याच जोडीचे पूजन करण्याची प्रथा आजही आहे.

बैलांची संख्या कमी!

मोरजीत पूर्वी शेकडो बैलांच्या जोड्या शेतकऱ्यांकडे होत्या. त्या बैलजोडीद्वारे पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची. आज चित्र बघितले तर हातावर मोजता येणाऱ्या बैलांच्या जोड्या आहेत. त्यात मळेकरवाडा येथील रवी शेटगावकर मरडीवाडा येथील दाजी सावंत इतर एक दोन चार बैलांच्या जोड्या कार्यरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com