Morjim News : मोरजीत गटार व्यवस्थेचे तीन तेरा; रस्त्यात खड्ड्यांमुळे तुंबले पाणी

संततधार पावसात विविध रस्त्यांवर ‘तलाव’
Morjim News
Morjim NewsDainik Gomantak

Morjim : आज येणार उद्या येणार, अशी चर्चा असतानाच अखेर जून अखेरीस राज्यात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. आणि सरकारी यंत्रणाची दाणादाण उडवत असतानाच सरकारी यंत्रणा किती निष्क्रिय आहे .हे मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या बाजूला नजर मारल्यानंतर दिसून येईल. गटार व्यवस्था कोलमडल्याने रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे रस्त्यावरील पावसाचे सर्व पाणी रस्त्यावर ठिकठिकाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

काही ठिकाणी रस्ते आहेत, की खड्डे आहेत, हेही लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वारांना त्याचा बराच त्रास होतो. दरम्यान, नुकतीच मोरजी पंचायत कार्यालयात कचरा निर्मूलन समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांनी रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाचे असल्यामुळे अधिकाऱ्यांनी रस्त्याची सरकारी जमीन कोणती, हे ठरवून ती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि रेखांकन करण्याची गरज होती. ती केली नसल्यामुळे लोकांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली.

Morjim News
Goa Congress : प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न ; गुन्ह्यांची बातमी लपवण्यासाठी गृह खात्याचे षडयंत्र

काहींच्या अंगणात, घरात शिरले पाणी

मोरजी पंचायत क्षेत्रातील गावडे वाडा, न्यू वाडा, पोके वाडा, मर्डी वाडा, मधला वाडा, नातोजी वर्णवाडा या भागातील रस्त्यावर साचलेले पाणी आणि तेथील गटार व्यवस्था प्रशासकीय अधिकाऱ्याने कशी कोलमडलेली आहे, हे पहावे.रस्त्यावरील गटारी नष्ट झाल्यानंतर पावसाचे आणि रस्त्यावरील पाणी थेट लोकांच्या अंगणात, घरात, झोपड्यांमध्ये शिरत असल्याचे चित्र दिसते.

Morjim News
Vishwajit Rane: प्रादेशिक विकास आराखड्यात कोटींचा घोटाळा- राणे

...अन्यथा रस्ता विभागावर धडक देऊ!

मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर पाणी साचून लोकांना त्याचा बराच त्रास होतो. याकडे वारंवार रस्ता विभाग दुर्लक्ष करत आहे. हा प्रकार जर असाच चालू राहिला तर मोरजी पंचायतीतर्फे नागरिकांना घेऊन पेडणे रस्ता विभाग कार्यालयावर धडक देऊ,असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. पंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला गटार आवश्यक असताना रस्ता रुंदीकरण आणि बांधकाम करतताना गटारी बुजवल्या आहेत.

Morjim News
Goa Monsoon: उशिरा मॉन्सूनचा ‘काकडी’ला फटका

भूमिगत केबलसाठीचे खड्डे ‘जैसे थे’

मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत यासाठी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या होत्या. परंतु त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न केल्याने पहिल्याच पावसात मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्त्यावर लक्ष फिरवल्यास झालेली बिकट स्थिती दिसून येते. वीज खात्याने भूमिगत केबलसाठी रस्ते मधोमध खोदलेले होते. पावसाळा सुरू झाला तरी ते बुजवलेले नाहीत. परिणामी खड्ड्यांमध्ये वाहने रूतण्यासह अपघात घडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com