Mopa Airport: ‘फ्लाय 91 उडान’ शहरांना जोडेल!

Mopa Airport: मुख्यमंत्र्यांना विश्‍वास : ‘मोपा’वरून लक्षद्वीपला उड्डाण; तिकीट विक्रीचा शुभारंभ
Manohar International Airport Mopa Goa
Manohar International Airport Mopa GoaDainik Gomantak

Mopa Airport:

‘फ्लाय 91 उडान योजनेअंतर्गत मोपा विमानतळामुळे गोव्याच्या जवळची शहरे कमी वेळात एकमेकांना जोडली जातील. त्यामुळे वेळ वाचणार आहे. मोपा विमानतळावरील विमानसेवा दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून परदेशातील पर्यटकही या सेवांमुळे आनंदी आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळाच्या सभागृहात सांगितले.

गोवास्थित ‘फ्लाय ९१’ एअरलाईन टियर २, टियर ३ शहरांतील कनेक्टिव्हिटी भारतातील नवीन विमान कंपनीच्या ‘फ्लाय ९१’ विमानाने मोपावरून मंगळवारी (ता.१२) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बावटा दाखविल्यानंतर लक्षद्वीपला उड्डाण केले.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कंपनीचे कार्यकारी संचालक मनोज चाको आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिकिटाच्या प्रतिकृतीचे अनावरण करून तिकीट विक्री सुरू केल्याची घोषणा केली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी विमान उड्डाणासाठी बावटा दाखवला.

Manohar International Airport Mopa Goa
Goa Crime News: युवतीच्या विनयभंगप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोपा विमानतळ व्यवस्थापन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गोव्याचा पर्यटन व्यवसाय वाढणार असून रोजगार क्षेत्रातलाही बराच फायदा होणार आहे, असे सांगितले.

सिंधिया यांच्या हस्ते दिल्लीतून उद्‌घाटन

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते दिल्ली येथे मंगळवारी (ता.१२) सकाळी मोपा विमातळावरील उड्डाणाचे ऑनलाईन उद्‌घाटन केल्यावर तिकीट विक्री काउंटरचा शुभारंभ करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Manohar International Airport Mopa Goa
Vishwajeet Rane: रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज

हवाई प्रवास सुलभ करू!

कंपनीचे कार्यकारी संचालक मनोज चाको म्हणाले की, आज ‘फ्लाय ९१’च्या माध्यमातून सामान्य माणसाचा प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे पाऊल उचलत आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना ‘फ्लाय ९१’द्वारे भारतातील हवाई प्रवास सुलभ, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. केवळ गोवा नव्हे तर शेजारील राज्यातही आमचे प्रादेशिक संबंध मजबूत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू.

मोपा विमानतळ लिंक रोडचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार व त्यानंतर वीस मिनिटांचे अंतर सात-आठ मिनिटांवर येईल. जीएमआरने यापूर्वी प्रशिक्षण देऊन कर्मचारी तयार केले आहेत. अशाच प्रकारे त्यांनी परत प्रशिक्षण द्यावे. त्यामुळे रोजगाराची समस्या कमी होईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com