Digambar Kamat: ‘अक्षय ऊर्जा पार्क’साठी प्रयत्न करणार

Digambar Kamat: मडगावात ‘गोंयचो पंचायत बाजार’चे उद्‌घाटन
Digambar Kamat
Digambar Kamat Dainik Gomantak

Digambar Kamat: आपण मुख्यमंत्री असताना जुन्या बाजारात न्यायालय इमारतीच्या बाजूला अक्षय ऊर्जा पार्कसाठी जागा संपादन केली होती. नंतर हा प्रकल्प अस्तित्वात आला नाही; पण जागा सरकारच्या ताब्यात आहे.

Digambar Kamat
Bhoma Road Issue: भोम रस्त्याला जनतेचा विरोध कायमच

या पार्कसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून पुन्हा प्रयत्न केले जातील, अशी माहिती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी गोंयचो पंचायत बाजारचे रवींद्र भवनमध्ये उदघाटन केल्यावर दिली.

महिला उद्योजकांना, व्यावसायिकांना आपले उत्पादन तेथे आणून विकता येईल. तळमजल्यावर आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन व वरच्या मजल्यावर त्यांना आपले उत्पादन तयार करण्यासाठी जागा, असा हा प्रकल्प असेल, असे कामत यांनी सांगितले.

एका दिवसाच्या गोंयचो पंचायत बाजाराचे आयोजन गोवा पंचायत महिला शक्ती अभियानने गोवा सुदोरप व रवींद्र भवन मडगावच्या सहकार्याने केले आहे.

या सोहळ्याला गोवा सुदोरपच्या वेर्मा जिमेलो, गोवा पंचायत महिला शक्ती अभियानच्या अध्यक्ष दीक्षा खानोलकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर, संजू नाईक, प्रसाद विर्नोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी रॉक वाझ व सारिका शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला व गोवा पंचायत महिला शक्ती अभियानच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या एकदिवसीय बाजारात अंदाजे ७५ ते ८० टेबलांवर महिला आपल्या खाद्यपदार्थ, तेल उत्पादन, कपडे, हस्तकला, सौैंदर्य प्रसाधने वगैरेची विक्री करीत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिता थोरात यांनी केले तर प्रशासक नेली रॉड्रिग्स यांनी सर्वांचे आभार मानले. उत्पादन विकत घ्यायला लोकांनी गर्दी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com