Goa News: साखळी आठवडी बाजारला संमिश्र प्रतिसाद

पहिल्या दिवशी विक्रेत्यांतही संभ्रम: नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची रविवारी बाजारात उपस्थिती
साखळीचा आठवडी बाजार
साखळीचा आठवडी बाजार Dainik Gomantak

Sanquelim weekly Market: साखळी पालिकेने आठवड्याचा बाजार आता रविवार व सोमवार असे दोन दिवस भरविण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी रविवार,३ रोजी पासून करण्यात आली. आजचा पहिलाच दिवस असल्याने साखळीतील या नवीन संकल्पनेतील बाजाराला संमिश्र असा प्रतिसाद लाभला. नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेविका दिपा जल्मी यांनी स्वतः बाजारात उपस्थित राहून विक्रेत्यांना दुकाने लावण्यास सांगितले.

साखळीचा आठवडी बाजार
Drushti: बुडणाऱ्या चौघा पर्यटकांना जीवरक्षकांकडून जीवदान

ओस पडत चाललेल्या साखळीच्या बाजारला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी आराखडा आखण्याची मागणी बाजारातील व्यापाऱ्यांची होती. या पार्श्‍वभूमीवर साखळीचा आठवडा बाजार रविवारीही भरविण्याचा निर्णय पालिकेने ठरावाद्वारे घेतला होता. या ठरावाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने गेल्या सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी सकाळी नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, नगरसेविका दीपा जल्मी, निकीता नाईक, पालिका मार्केट निरीक्षक बसप्पा यांनी बाजारात फिरून सर्व विक्रेत्यांना रविवारी साखळी बाजारात दुकाने थाटण्याचे आवाहन केले होते.

... तर दुकान थाटू देणार नाही !

बाजारात दोन दिवस आठवडा बाजार भरविण्याची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्यानुसार रविवार, ३ सप्टें. रोजी सकाळी साखळी बाजारात काही भाजीविक्रेते दाखल झाले होते. परंतु कपडे, चप्पल व इतर.सामान विक्रेते बाजारात दाखल झाले नव्हते. काहीच कपडेवाले आले होते. नगराध्यक्षा देसाई यांनी बाजाराला उपस्थित नसलेल्या विक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांना बाजारात येण्याचे आवाहन केले. रविवारी जर बसणार नसाल तर पुढील सोमवारीही दुकान थाटू देणार नाही, असा इशाराच त्यांनी विक्रेत्यांना दिला.

साखळीचा आठवडी बाजार
Ashtami Ferry: पणजी अष्टमी फेरीच्या अर्जांची आज विक्री

सकाळी ग्राहकांनी गर्दी केली, पण..

साखळीचा आठवडा बाजार आता रविवार व सोमवार असे दोन दिवस भरणार असल्याच्या माहितीचा प्रसार सर्वत्र झाला होता. त्यामुळे साखळी व परिसरातील लोकांनीही या बाजारासाठी तयारी केली होती. सकाळी बाजार भरणार या आशेने ग्राहकांनी बाजारात बरीच गर्दी केली. पण भाजी विक्रेते वगळता कपडे, चप्पल व इतर विक्रेत्यांनी आपली दुकानेच न थाटल्याने लोकांची निराशा झाली. संध्याकाळी ६.३० नंतर तर बहुतेक विक्रेत्यांनी आपले सामान गुंडाळले होते.

विक्रेते संभ्रमात

दोन दिवस आठवडा बाजाराची संकल्पना प्रथमच राबविण्यात येत असल्याने विक्रेत्यांच्या मनात रविवारी दुकाने थाटल्यास ग्राहक येतील की नाही, व्यवसाय होणार की नाही, या संभ्रमात विक्रेते होते. परंतु सकाळी ग्राहकांची वर्दळ पाहिल्यानंतर काहींनी आपली दुकाने थाटली. तर काहीजण बाजाराला माल घेऊन आलेच नाही. ही या विक्रेत्यांमधील संभ्रमावस्था दूर करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com