Minister Ravi Naik : समाज सभागृहात विचारांचे आदण प्रदान हवे, केवळ राजकीय मतांसाठी ....

कृषी मंत्र्यांच्या हस्ते खांडेपार येथे ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे नूतन सभागृह
Minister Ravi Naik
Minister Ravi Naik Dainik Gomantak

आज गावातील भांडणे मिटवून एकजुटीने राहण्याची गरज असून समाज सभागृहातून एकोप्याचा विचार पुढे यायला हवा. चांगल्या विचारांचे आदानप्रदान व्हायला हवे, असे उदगार फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी काढले. गावठण-खांडेपार येथील माणागुरु देवस्थानच्या नूतन सभागृहाचे उद््घाटन रवी नाईक यांच्या हस्ते झाले. ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे हे सभागृह बांधण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, कुर्टी-खांडेपारच्या सरपंच संजना नाईक, उपसरपंच विल्मा परेरा, पंचसदस्य अभिजीत गावडे, हरेष नाईक, मनीष नाईक, साजिदा सय्यद, पंचायत सचिव सचिन नाईक तसेच माणागुरु देवस्थानचे अध्यक्ष गणपत नाईक, ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत नाईक, स्वयंपूर्ण मित्र सुदेश गावडे आदी उपस्थित होते. नामफलकाचे अनावरण व समई प्रज्वलनाने सभागृहाचे उदघाटन झाले.

Minister Ravi Naik
Goa Monsoon Update 2023: सावधान... राज्यात अतिवृष्टीचा इशारा

यावेळी रितेश नाईक म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांच्या उत्कर्षासाठी सरकारकडून विविध योजना आखल्या जातात, त्याचा लाभ घ्यायला हवा. सरपंच संजना नाईक तसेच माजी सरपंच जॉन परेरा यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक पंचसदस्य अभिजीत गावडे यांनी केले. सूत्रसंचालन मंगलदास नाईक, तर मनीष नाईक यांनी आभार मानले.

Minister Ravi Naik
Goa-Raipur Flight: गोवा-रायपूर फ्लाईटला तब्बल चार तास उशीर; प्रवाशांचा गोंधळ

मतांसाठी तंटा नको!

गावागावांत भांडणे होतात, एकमेकांत तेढ निर्माण होते, राजकीय पक्षांमुळे वातावरण तापते, उमेदवार निवडून येतात; पण कार्यकर्त्यांमध्ये तंटे होतात. त्यामुळे आपापसांतील संबंध ताणले जातात. ही भांडणे आधी रोखली पाहिजेत. आपसातील मतभेद दूर सारून प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा, गावाचा आणि पर्यायाने राज्याचा विकास करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन रवी नाईक यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com