Iffi Goa 2023 : हॉलिवुड अभिनेते ''डग्लस'' यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव’ ; 54 व्या इफ्फीत होणार सन्मान

मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेचा ‘सत्यजित रे जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.
Michael Douglas
Michael DouglasDainik Gomantak
Published on
Updated on

Iffi Goa 2023: पणजी, ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेचा ‘सत्यजित रे जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.

जागतिक चित्रपट क्षेत्रातील महत्त्वाच्या वार्षिक कार्यक्रमांपैकी एक असलेल्या ५४व्या इफ्फीमध्ये मायकेल डग्लस यांची पत्नी नामवंत अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या कॅथरिन झिटा जोन्स, त्यांचा मुलगा अभिनेता डायलन डग्लस हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

भारतीय चित्रपट उद्योगात २५ वर्षे पूर्ण करणारे भारतीय चित्रपट निर्माते आणि पर्सेप्ट लिमिटेड आणि सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलचे संस्थापक शैलेंद्र सिंग हेदेखील या महोत्सवाला उपस्थित असतील.

मंत्री ठाकूर यांनी मायकेल डग्लस, त्यांची पत्नी कॅथरिन झिटा जोन्स आणि त्यांचा पुत्र डायलन डग्लस यांचे स्वागत केले आहे.

भारतामध्ये मायकेल डग्लस यांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे आणि आमचा देश आपली समृद्ध सिनेमॅटिक संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यांचे दर्शन घडवण्यासाठी उत्सुक आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. 

अनेक पुरस्कारांनी गौरव

या वर्षाच्या सुरवातीला मायकेल डग्लस यांना ‘कान’ चित्रपट महोत्सवादरम्यान एका भव्य कार्यक्रमात, इंडिया पॅव्हेलियनमध्ये ‘मार्चे डू फिल्म’अंतर्गत सन्मानित करण्यात आले होते. ज्यामधून चित्रपट उद्योगावरील त्यांचा जागतिक प्रभाव अधोरेखित होतो.

मायकेल डग्लस यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात दोन अकादमी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक एमी पुरस्कार यांचा यात समावेश आहे.

१९९९ मध्ये सुरवात : ‘सत्यजित रे जीवनगौरव’ पुरस्काराची सुरवात १९९९ मध्ये ३०व्या इफ्फीमध्ये झाली. चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

चित्रपट जगतातील दिग्गज म्हणून मायकेल डग्लस यांची ओळख आहे. आपल्या अतुलनीय प्रतिभेने आणि कलेशी असलेल्या बांधिलकीने त्यांनी जगभरातील प्रेक्षकांना मोहीत केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com