Crime News : मेरशी येथे शेतात सांडपाणी सोडल्याप्रकरणी एकास अटक

Crime News : मंगळवारी उत्तररात्री संशयित बसवराजला जुने गोवे पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक एडविन डायस करीत आहेत.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Crime News : तिसवाडी, मेरशी येथे शेतात सांडपाणी सोडून सभोवतीच्या परिसरात आजार पसरण्याची परिस्थिती निर्माण केल्याबद्दल बसवराज हरिजन (शांतीनगर, सुकूर-बार्देश) याला जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

हे प्रकरण मंगळवार, १४ रोजी घडले होते, जेव्हा अश्विनी वॉशिंग सेंटर, मेरशी येथे सांडपाणी शेतात सोडत असताना सिवरेज टँकरला पकडण्यात आले होते.

Crime News
Goa Accidental Death: तिसरे काढण्यास गेलेला मुलगा बेतुल येथे बुडाला

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेत कॉन्स्टेबल सिद्धेश मेणकुरकरच्या तक्रारीवर भादंसंच्या कलम २६९, २७० आणि पाणी कायदा १९७४ अंतर्गत कलम २६ आणि ४४ नुसार गुन्हा नोंद केला. मंगळवारी उत्तररात्री संशयित बसवराजला जुने गोवे पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक एडविन डायस करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com