Traffic Police : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मडगाव पोलिसांची कारवाई

Traffic Police : रात्रीच्या वेळी जास्त अपघात होतात. त्यामुळे पाहणी करण्यासाठी ही मोहीम उघडण्यात आली, असे मडगाव वाहतूक पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी सांगितले.
 Traffic Police
Traffic Police Dainik Gomantak
Published on
Updated on

Traffic Police :

सासष्टी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मडगाव वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई केली. जवळ जवळ १६६ चालकांना अडविण्यात आले. त्यातील तिघेजण दारू पिऊन वाहन चालवताना आढळले.

रात्रीच्या वेळी जास्त अपघात होतात. त्यामुळे पाहणी करण्यासाठी ही मोहीम उघडण्यात आली, असे मडगाव वाहतूक पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी सांगितले.

दारू पिऊन, हेल्मेट न घालता, सीट बेल्ट न घालता वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. लोकांमध्ये वाहतूक नियमांची जागृती होण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. स्वतःचा जीव सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वाहन चालवताना आपल्या मागे असलेल्या कुटुंबियांचाही विचार करायला हवा. आम्ही लोकांना सतावण्यासाठी ही कारवाई करीत नसून नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणे किती धोकादायक असते हे सांगण्यासाठीच ही कारवाई करीत असल्याचे पोलिस निरीक्षक दळवी यांनी सांगितले.

 Traffic Police
Goa Top News: पेडण्यात संरक्षक भिंत कोसळली, पावसाची अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

रात्रीच्या वेळी प्रत्येक बसचालकाची तपासणी होणे आवश्यक आहे. कधी कधी महिलासुद्धा नियमांचे उल्लंघन करतात. तेव्हा रात्रीच्या वेळी महिला पोलिससुद्धा असणे गरजेचे आहे. ही कारवाई अत्यंत आवश्यक आहे. लोकांना कायद्याची भीती वाटली पाहिजे.

- महेश आमोणकर,

नगरसेवक, मडगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com