Margao Fish Market: एसजीपीडीए मार्केटातील पॅसेजवर मासळी, भाजी विक्रेत्‍यांचे अतिक्रमण

भाजी मार्केटातही भाजीवाल्‍यांनीही आपल्‍या सामानांनी मधले पॅसेज अडवून ठेवल्‍याने ग्राहकांना माल खरेदी करण्‍यासाठी चिंचोळ्‍या जागेतून जावे लागते.
Margao Fish Market
Margao Fish MarketGomantak Digital Team

Margao Fish Market: राज्‍याची व्‍यावसायिक राजधानी असलेल्‍या मडगावातील मुख्‍य मार्केट असलेले एसजीपीडीए मार्केटातील मासळी आणि भाजी मार्केटात विक्रेत्‍यांची मनमानी चालू आहे.

येथे ग्राहकांना चालण्‍यासाठी ज्‍या पॅसेजिस ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या, त्‍यातील अर्ध्या भागावर या विक्रेत्‍यांनी अतिक्रमण केल्‍याने गर्दीच्‍यावेळी या मार्केटातून चालणेही लोकांना मुष्‍कील होत आहे.

मार्केट परिसरात जो किरकोळ मासळी बाजार आहे, त्‍यात मासेमाऱ्यांना आपले मासे चांगल्‍यापैकी विकता यावेत यासाठी खास व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

मात्र, त्‍यासाठी त्‍यांनी मधला पॅसेज अतिक्रमित केला आहे. या माशांच्‍या पाट्यातील घाण पाणी या पॅसेजमध्‍ये वाहत असल्‍याने ग्राहकांना ती घाण तुडवीत मासे विकत घ्‍यावे लागतात.

Margao Fish Market
Goa University: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल रद्द करण्याच्या विद्यापीठाच्या मागणीवर सरकारचा मोठा निर्णय

भाजी मार्केटातही भाजीवाल्‍यांनीही आपल्‍या सामानांनी मधले पॅसेज अडवून ठेवल्‍याने ग्राहकांना माल खरेदी करण्‍यासाठी चिंचोळ्‍या जागेतून जावे लागते. यासंबंधी ग्राहकांनी जाप विचारल्‍यास हे विक्रेते त्‍यांच्‍या अंगावर धावून येतात, अशी माहिती एका ग्राहकाने दिली.

यासंबंधी एसजीपीडीएने लक्ष घालून ग्राहकांना चालण्‍यासाठी या पॅसेजीस मोकळे करुन द्यावेत, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com