Margao News : मडगावसह परिसरात १२,९८९ वाहतूक नियमभंगाची प्रकरणे नोंद; सर्वाधिक गुन्‍हे नो एन्ट्रीत प्रवेश करणाऱ्यांचे

Margao News : हा टप्पा दोन्ही प्रकरणांत ३५००च्या वर गेलेला आहे. अशाने वाहतूक नियम शिस्तीबद्दल वाहनचालकांकडून दुर्लक्ष होत असल्याने अपघात प्रकरणांत वाढ होत आहे.
Traffic Police
Traffic PoliceDainik Gomantak

Margao News :

फातोर्डा, मडगाव व सभोवतीच्या परिसरात जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान १२,९८९ वाहतूक नियमभंगाची प्रकरणे घडली आहेत. यातील सर्वाधिक प्रकरणे नो एन्ट्री व अन्य वाहनांना अडथळा निर्माण करण्यासाठी घडलेली आहेत.

हा टप्पा दोन्ही प्रकरणांत ३५००च्या वर गेलेला आहे. अशाने वाहतूक नियम शिस्तीबद्दल वाहनचालकांकडून दुर्लक्ष होत असल्याने अपघात प्रकरणांत वाढ होत आहे.

मडगाव, कोलवा, वेर्णा, कुडतरी, कुंकळ्ळी, फातोर्डा या ठिकाणी जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान १२,९८९ वाहतूक नियमभंगाची प्रकरणे घडली आहेत. यात हेल्मेट न वापरता दुचाकी चालविण्याच्या १,०७० प्रकरणांची नोंद झाली आहे. ट्राफिकला अडथळा निर्माण करून वाहने हाकण्याची ३,७६९ अशी प्रकरणे घडली आहेत. तसेच नो-एन्ट्रीच्या दिशेने वाहन चालविण्याची ३,८३३ अशी प्रकरणे घडली आहेत.

त्‍याबरोबरच ओव्हरस्पीडने वाहन चालविणे ९६८, दारू पिऊन वाहन चालविणे १७७, गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे १७५, काळ्या काचा ५६४, वाहन क्रमांक बरोबर नसणे ४०५, नो-पार्किंगची ३४३, परवाना नसताना वाहन चालविणे २१ प्रकरणे मागील चार महिन्यांच्या काळात घडली असल्याची माहिती मडगाव ट्राफिक विभागाकडून प्राप्त झाली आहे.

वेर्णा महामार्ग परिसरात चार महिन्यांत एकंदरीत ८४ वाहन अपघातांची प्रकरणे घडली आहेत. यात सहाजणांचे बळी गेले आहेत, अशी माहिती वेर्णा पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तसेच कुंकळ्ळी पोलिस हद्दीत वाहन अपघातात सहाजण बळी पडले आहेत तसेच इतर क्षेत्रांत वाहन अपघातात ८ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात कुडतरी, फातोर्डा परिसराचा समावेश आहे.

याविषयी माहिती देताना मडगाव ट्राफिक पोलिस अधिकारी संजय दळवी यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपले वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. प्रत्येकाला कुठेना कुठे जाण्याची घाई असते. यासाठी वाहन नियमांचे पालन न करणे हे उचित नाही. आपल्‍या घरी मुले-बाळे, आई-वडील, बायको असे कुणी ना कुणी वाट पाहत असतात, त्यांचा विचार करावा.

Traffic Police
Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

वाहनचालकांनी काळजी घ्यावी!

कोलवा पोलिस स्थानकाचे ट्राफिक पोलिस निरीक्षक आलवितो रॉड्रिग्स यांनी सांगितले की, ट्राफिक नियमाविषयी शालेय मुलांमध्ये, टॅक्सीचालकांमध्ये, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याचे काटेकोरपणे पालन केल्यास रस्ता अपघाताला आळा बसणार आहे. या परिसरात मागील चार महिन्यांच्या काळात वाहन अपघातात ३ जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी आपली व इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com