Mapusa News : म्हापशातील ‘ते’ शौचालय अज्ञातांकडून जमीनदोस्त

Mapusa News : हा प्रकार समजताच पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत शौचालय जमीनदोस्त झाले होते. पालिकेच्या मालकीचे हे शौचालय पाडले असले तरीही रात्री उशिरापर्यंत पालिकेकडून या बेकायदेशीर प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली नव्हती.
Mapusa
Mapusa Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News :

म्हापसा, विठ्ठलवाडी-अन्साभाट येथील म्हापसा नगरपालिकेच्या मालकीचे सार्वजनिक शौचालय (टॉयलेट ब्लॉक) जेसीबीचा वापर करून कुणीतरी पाडले. याविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिका अभियंत्यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

हा प्रकार समजताच पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत शौचालय जमीनदोस्त झाले होते. पालिकेच्या मालकीचे हे शौचालय पाडले असले तरीही रात्री उशिरापर्यंत पालिकेकडून या बेकायदेशीर प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

उपलब्ध माहितीनुसार, शनिवार, १५ रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास विठ्ठलवाडी येथील मॉडर्न सोफ फॅक्टरीजवळील सार्वजनिक शौचालयाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली. यासाठी जेसीबीचा वापर केला. पालिकेच्या मालकीचे शौचालय दिवसाढवळ्या पाडण्याच्या प्रकाराबद्दल रहिवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

Mapusa
Goa Fraud Case: 1 हजार कोटींची फसवणूक! गोव्यातील चौगुले कंपनीच्या सल्लागारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

म्हापसा नगरपालिकेने १९८५मध्ये विठ्ठलवाडी व इतर परिसरातील लोकांच्या सोयीसाठी हे शौचालय उभारले होते. यासाठी येथील एका व्यक्तीने पालिकेला ही जमीन दान केली होती. २०१५पर्यंत या शौचालयाचा वापर केला जात होता.

संशयितांना अटक करावी

विठ्ठलवाडी येथील सार्वजनिक शौचालयाची इमारत अज्ञातांनी जमीनदोस्त केली आहे. पालिकेने याची गंभीर दखल घ्यावी व चौकशी करून तत्काळ पोलिसांत तक्रार करून संशयितांना अटक करावी, अशी मागणी माजी नगरसेवक तुषार टोपले यांनी केली.

अहवाल देण्याचे निर्देश

पालिकेच्या शौचालयाची इमारत पाडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार संबंधित पर्यवेक्षकाला पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती म्हापसा पालिका अभियंत्याने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com