Mapusa News : म्हापशात विशेष गस्त मोहीम; तिघांना अटक, ५५ ताब्यात

Mapusa News : १२७ भाडेकरूंची केली पडताळणी; अनेकांवर गुन्हे दाखल
Mapusa
Mapusa Dainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा, वाढती गुन्हेगारी तसेच बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी म्हापसा पोलिसांनी शनिवारी रात्री म्हापसा शहर परिसरात विशेष गस्त मोहीम राबविली. त्यामध्ये काहीजणांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून ५५ जणांना ताब्यात घेतले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी (ता. २२) रात्री ८ ते मध्यरात्रीपर्यंत म्हापसा पोलिसांच्या पथकाने मार्केट तसेच आजूबाजूच्या परिसरात विशेष मोहीम राबविली. पोलिसांनी या गस्तीदरम्यान अनेक अवैध गोष्टी रोखल्या.

विशेष मोहिमेदरम्यान, म्हापसा पोलिसांनी कोटपा कायद्यांतर्गत १७ गुन्हे दाखल केले, तर खुल्या जागेत कचरा टाकण्याची १३ प्रकरणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याची सहा प्रकरणे आणि १२७ भाडेकरू पडताळणी करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी आयपी कायद्याच्या कलम ३४ अन्वये दोघांना आणि कलम १५१ अन्वये एका व्यक्तीला अटक केली.

उपअधीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले की, आम्ही विशेष गस्त मोहीम राबविली, ज्यात भाडेकरू पडताळणी केली, तसेच विविध गुन्हे दाखल केले आहेत.

Mapusa
Rafale M Aircraft: भारत फ्रान्सकडून घेणार राफेल मरीन फायटर जेट; वैमानिकांना गोव्यात देणार प्रशिक्षण

शहरात गुन्हेगारी घटल्याचा दावा

म्हापशामध्ये गुन्हेगारी वाढली आहे, असा आरोप काही लोक करतात. मात्र, यंदा जानेवारी ते जूनपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत तथ्ये आणि आकडेवारीची तुलना केल्यास २०२४ मध्ये १७ प्रकरणे कमी नोंदली गेली आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्हे शोध दर १० टक्क्यांनी वाढला आहे. म्हापशामध्ये गुन्हे कमी झाले असून तपास वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते, असेही उपअधीक्षक चोडणकर यांनी सांगितले.

कायदा-सुव्यवस्था बिघडली : फेरेरा

कॉंग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी या मोहिमेची टर उडविली आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी रणनीती आखावी. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण झाला आहे.

शहरात गुन्हे होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी गस्त घालणे, बंदोबस्त वाढविणे आवश्यक असून गरज पडल्यास त्या ठिकाणी गस्त घालता आली असती. पण आजूबाजूला कोणीही नसताना गस्त घालणे हास्यास्पद गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com