Mapusa News : म्हापशातील जीर्ण इमारत बनली धोकादायक; सज्जा कोसळून चार वाहनांचे नुकसान

Mapusa News : सहा वर्षांपूर्वी इमारत मालकाने पालिकेला पाहणी करण्याची केली होती विनंती
Mapusa
MapusaDainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा, तळीवाडा, म्हापसा येथील जानकी लॉजसमोरील ‘कोसकर अ‍ॅण्ड केसरकर’ या जीर्ण इमारतीचा सज्जा शुक्रवारी (ता.७) सकाळी ११.३० वा.च्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. यामध्ये चार वाहनांचे नुकसान झाले असून एकजण किरकोळ जखमी झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

उपलब्ध माहितीनुसार, ४५ वर्षे जुने बांधकाम असलेली ही इमारत धोकादायक स्थितीत आहे. ही इमारत रिकामी असून तळमजल्यावर फक्त एकच छोटेसे स्पोर्ट्‌स साहित्य मिळणारे दुकान आहे. या इमारतीच्या तळमजल्याच्या छतावरील काँक्रिटचा सज्जा अचानक कोसळला. परिणामी, यात इमारतीखाली रस्त्यालगत पार्क केलेल्या चार वाहनांचे नुकसान झाले.

याबाबत माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत, कोसळलेल्या सज्जाचा उर्वरित धोकादायक भाग काढून टाकला. म्हापसा पोलिस निरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक आदित्य गाड, हवालदार केशव नाईक, आल्विटो डिमेलो यांनी घटनेचा पंचनामा केला.

Mapusa
Calangute Goa: गुगल मॅपमुळे पुणेकर गोव्यात चुकला, कळंगुट बीचवर पोलिसांनी केली कारवाई

दरम्यान, कोसकर अ‍ॅण्ड केसरकर इमारतीचे सहमालक पुरूषोत्तम कोसकर यांनी जानेवारी २०१८मध्ये म्हापसा नगरपालिकेला पत्र पाठवून इमारत जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत असल्याची माहिती दिलेली. तसेच या इमारतीची पाहणी करावी, अशी विनंती या पत्राद्वारे त्यांनी

केली होती. मात्र, मागील सहा वर्षे पालिकेने या पत्राची दखलच घेतलेली नाही.

म्हापसा पालिका ठरली अपयशी

२०१४ मध्ये काणकोण येथे इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, त्याच वर्षी म्हापसा नगरपालिकेने आपल्या पालिका कार्यक्षेत्रातील मोडकाळीस येऊन धोकादायक स्थितीतील इमारतींचे सर्व्हेक्षण करून इमारत मालकांविरुद्ध पालिका कायद्याच्या कलम १९०नुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार शहरातील जवळपास १२ इमारतींना नोटीसा बजावून इमारत खाली करण्याचा आदेश इमारत मालक आणि भाडेकरूंना दिला होता. मात्र, त्यांनी अद्याप त्या इमारती खाली केलेल्या नाहीत. एखाद्या इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडल्यास पालिकेकडून त्याची तात्पुरती दखल घेतली जाते. मात्र, गेल्या १० वर्षांत धोकादायक घोषित केलेली एकही इमारत पाडण्यात पालिकेला यश आलेले नाही.

जीवितहानी टळली

काँक्रिटचा सज्जा कोसळल्याने इमारतीखाली रस्त्यालगत पार्क केलेल्या जीए ०३ व्हाय ५६२३ ही रावजी धारगळकर यांची आय ट्वेन्टी कार व जीए ०३ झेड ३०४९ ही डोरोथी परेरा यांची वेगन-आर कार तसेच जीए ०४ के ७५७६ व जीए ०३ एयू ४३९२ या दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

या घटनेवेळी रावजी धारगळकर हे आपल्या इमारतीमधील दुकानात होते. सज्जा कोसळल्याचा आवाजाने ते दुकानातून बाहेर पडले असता, त्यांच्या हातावर सज्जाचे काही तुकडे पडले. यात ते किरकोळ जखमी झाले. तसेच या इमारतीच्या पदपथावर दोघे मजूर झोपले होते. मात्र, दुर्घटनेच्या काही क्षणापूर्वीच ते उठून निघून गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com