चार जण दगावल्याने ‘लोटली’ला धक्का

हॅलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते निघाले होते पणजीकडे
Zuari Car Accident
Zuari Car Accident Dainik Gomantak

मडगाव : लोटली गावात ''पुपूल'' या नावाने लोकप्रिय असलेल्या लोटलीच्या माजी पंच प्रिसीला क्रुज हिच्यासह तिचे पती हेन्री आरावजो, दिर हेली (अल्विन) आरावजो आणि त्यांचा शेजारी ऑस्टिन फर्नांडिस या चार जणांना एकाच दिवशी अपघाती मृत्यू आल्याने संपूर्ण लोटली गावाला धक्का बसला.

गुरुवारी सायंकाळी लोटली या भागाला भेट दिली असता बुधवारी नेमके काय झाले, त्याबद्दल गावातही फारशी माहिती नसून लोकांकडून परस्पर वेगळी माहिती मिळाली. ज्या घरातील तीन व्यक्ती गेल्या त्यांचेही घर बंद असल्याने नक्की काय झाले, ते कळू शकले नाही.

28 जुलै रोजी हेलीचा वाढदिवस होता. त्यामुळे काल रात्री त्यांनी घरीच डिनर ठेवले होते. त्या डिनरला त्यांचा शेजारी ऑस्टिन हाही आला होता. रात्री 12 वाजता त्यांनी बर्थडे केक कापला व नंतर ते चौघेहीजण पणजीला जायला निघाले. यावेळी प्रिसीला गाडी चालवत होत्या. या डिनरच्यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले असावे, अशी शंकाही काही जणांनी व्यक्त केली.

Zuari Car Accident
Goa Accident : कार नाल्यात कोसळून भीषण अपघात; चौघांना वाचवलं

क्रुज यांचे अगदी जवळचे मित्र असलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना याबद्दल विचारले असता, काल रात्री नक्की काय झाले आणि ते चारही जण पणजीला का गेले, हेही कुणाला माहीत नाही, असे त्यांनी सांगितले. रात्री उशिरा डस्टर गाडी पाण्यात पडली, ही बातमी कळल्यावर मी विचारपूस केली असता ते चारही जण घरी परतले नाहीत, ही बातमी मला मिळाली असे सिक्वेरा यांनी सांगितले.

साखरपुडाही ठरला होता!

या अपघातात जो चौथा बळी गेला, तो ऑस्टिन फर्नांडिस हा त्यांचा शेजारी असून तो जहाजावर काम करतो. हल्लीच तो आपल्या गावी आला होता. ऑस्टिनचे लग्नही ठरले होते. काही दिवसांतच त्याचा साखरपुडा ठरला होता. त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याने लोटलीत लोक हळहळ व्यक्त करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com