Goa News : समाजसेवेत जात-धर्म असा भेद नाही! पल्लवी धेंपे

Goa News : आपल्याला समाज सेवा करणे आवडते. तेव्हा या निवडणुकीत निवडून देत आपल्याला समाज सेवेची संधी देण्याचे आवाहन त्यांनी या बैठकांतून लोकांना केले.
Pallavi Dhempe
Pallavi DhempeDainik Gomangak

Goa News :

सासष्टी, भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यावर संध्याकाळी फातोर्डा मतदार संघात पाच कोपरा बैठका घेतल्या.गेली २६ वर्षे आपण सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.

आपल्याला समाज सेवा करणे आवडते. तेव्हा या निवडणुकीत निवडून देत आपल्याला समाज सेवेची संधी देण्याचे आवाहन त्यांनी या बैठकांतून लोकांना केले.

गवळीवाडा, सेंट ज्योकीम कपेल बोर्डा, विद्यानगर, आगाळी व जुन्ता क्वॉटर्स या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.

आम्ही समाजसेवा करताना किंवा शाळा कॉलेज चालवताना धर्म,जात पहात नाही. धेंपोची स्कॉलरशीप योजना आहे, त्यातून उच्च शिक्षणांसाठी गरजू व हुषार विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. आम्ही कित्येक शाळा दत्तक घेतल्या आहेत. दत्तक घेण्यापुर्वी शाळांचा निकाल ३० ते ३५ टक्के असायचा. आता निकाल ९० पेक्षा जास्त टक्के लागत आहे असेही त्यानी सांगितले.

Pallavi Dhempe
Goa News : जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष; कुठ्ठाळीच्या जाहीर सभेत युरी आलेमांव यांचे भाजपवर टीकास्त्र

या बैठकांमध्ये मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, माजी आमदार दामोदर नाईक, भाजप दक्षिण गोवा जिल्हा समिती अध्यक्ष तुळशीदास नाईक व फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांनीही मार्गदर्शन केले.

पल्लवी धेंपे या हुशार असून त्या लोकसभेत गोव्याच्या समस्या, प्रश्‍न प्रभावीपणे मांडतील, असे बाबू आजगावकर यांनी सांगितले.

दिगंबर कामत यांनी सांगितले की, ही निवडणूक महत्वाची असून या निवडणुकीवर देशाचे भविष्य, दिशा ठरणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून हॅट्ट्रिक करतील, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या केंद्र सरकारने मोदीच्या नेतृत्वाखाली गरिबांना शिक्षण व आरोग्य या मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असेही कामत यांनी सांगितले.

महिलांच्या उन्नतीसाठी भाजप सरकारने कायदा आणला, असे दामू नाईक यांनी सांगितले. भाजपने याच निवडणुकीत महिलांना आरक्षण देण्यास सुरवात केली असून २५ ते ३० टक्के आरक्षण या निवडणुकीत महिलांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com