Shiroda
Shiroda Dainik Gomatnak

Shiroda News : पल्लवी धेंपेंचा विजय निश्चित : सदानंद तानावडे

Shiroda News : या प्रचारातून पल्लवी धेंपे यांचा विजय हा दोनशे टक्के ठरलेला असून निकालाच्या दिवशी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.

Shiroda News :

शिरोडा, भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या विजयासाठी शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाला तोड नाही.

या प्रचारातून पल्लवी धेंपे यांचा विजय हा दोनशे टक्के ठरलेला असून निकालाच्या दिवशी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.

शिरोडा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. याप्रसंगी जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोड्याचे सरपंच पल्लवी शिरोडकर, डॉ. गौरी शिरोडकर, सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, पंचायत सदस्य सुवास नाईक, शिवानंद नाईक, विठू नाईक, श्रीकांत शिरोडकर आदी मान्यवरांबरोबरच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Shiroda
Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

‘शिरोडा मतदारसंघ भाजपमय’

याप्रसंगी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, की शिरोडा मतदारसंघ आता भाजपमय बनलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी शिरोडा मतदारसंघात तमाम मतदारांनी पल्लवी धेंपे यांना प्रचंड मतांनी विजयी करून मोंदीचे हात बळकट करून आपला अधिक विकास करून घ्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com