Tourist and Local Fight: दोघांच्या भांडणात तिसऱ्याला मार! कळंगुटमध्ये दोन गटांच्या मारामारीत मध्यस्थी करणारा टॅक्सीचालक जखमी

पोलीस अधिक तपास करत आहेत.
Tourist and Local Fight
Tourist and Local FightDainik Gomantak

Fight between local and tourist group

आज पहाटे 3 वाजता कळंगुट बागा रोडवर स्थानिक आणि पर्यटक यांच्यात मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या वादामध्ये स्थानिक टॅक्सीचालक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Tourist and Local Fight
Goa Live Updates 06 January 2023: मुख्यमंत्री म्हणतात 'गोवा महाराष्ट्राचा जिल्हा असल्यासारखी वागणूक यापूर्वी केंद्राने दिली'

उपलब्ध माहितीनुसार, पर्यटकांचा एक गट किनारी भागात वावरत असताना, काही युवकांनी पर्यटकांच्या ग्रुपमधील मुलींवर शेरेबाजी केली. हे युवक फोंड्यातील असल्याचे कळते. यावेळी पर्यटक आणि त्या युवकांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.

सुरू असलेला वाद पाहून तिथेच असलेल्या एका स्थानिक टॅक्सीचालकाने यामध्ये मद्यस्थी केली. तो वाद मिटवायचा प्रयत्न करत होता. मात्र यामध्ये त्यालाच मारहाण झाली. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर मात्र पर्यटक मुलींची छेड काढणाऱ्या युवकांनी मात्र तिथून पळ काढला. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com