Mapusa Bus Stand: बेकायदेशीर दुकानाबाबत वाहतूक विभागास पत्र

गोवा कॅनकडून चिंता व्यक्त : म्हापसा केटीसी बसस्थानकावर अवैध बांधकाम
Mapusa Bus Stand
Mapusa Bus StandDainik Gomantak

म्हापसा येथील केटीसी (KTC) बसस्थानकावर बांधलेले कथित दुकान अद्याप मोडलेले नसून सध्या या दुकानात इंटेरिअरचे काम सुरू असल्याने गोवा कॅनने चिंता व्यक्त केली. यासंदर्भात गोवा कॅनने वाहतूक विभागास पत्र लिहिले आहे. (Mapusa Bus Stand)

गोवा कॅनने म्हापसा केटीसी बसस्थानकावर कोणताही अनुचित अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक सुरक्षिततेच्या हितासाठी या दुकानाचे बांधकाम पाडण्याचे काम हाती घेण्याची मागणी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

Mapusa Bus Stand
Goa Assembly: राज्यपालांच्या अभिभाषणात ‘म्हादई’ नाहीच

गोवा कॅनने वाहतूक विभागाचे (प्रशासकीय) संचालक नॅन्सी फर्नांडिस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, म्हापसा येथील केटीसी बसस्थानकाच्या फलाटावर बांधलेले हे कथित बेकायदेशीर दुकान अद्याप मोडलेले नसून याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. कदंब वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक परेरा नेटो यांना हे बांधकाम पाडून जागा पूर्ववत करण्यास सांगितले होते. सध्या या दुकानाचे रंगकाम करून आतील इंटेरिअरचे काम जोरात चालू आहे. जेणेकरून दुकानातून व्यवसाय चालू करता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com