Leopard Trapped: मोठी बातमी! मुळगावात संचार करणारा बिबट्या अखेर सापळ्यात अडकला

भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबटा आज (मंगळवारी) पहाटे वन खात्याने लावलेल्या सापळ्यात अडकून पडला.
Leopard roaming in Mulgao is finally trapped
Leopard roaming in Mulgao is finally trappedDainik Gomantak
Published on
Updated on

मुळगावात संचार करणारा बिबट्या अखेर सापळ्यात अडकला. भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबटा आज (मंगळवारी) पहाटे वन खात्याने लावलेल्या सापळ्यात अडकून पडला. वन खात्याला ही माहिती मिळताच पहाटेच बिबट्याला तेथून हलविण्यात आले. हा बिबटा मादी असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुळगावात भर लोकवस्तीजवळ एका बिबट्याचा संचार होता. गावकरवाडा येथील गौरेश परब यांच्या पाळीव कुत्र्याला जबड्यात पकडून पळतानाचे दृष्य सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने गेल्या मंगळवारी (ता.8) गौरेश परब यांच्या घराच्या मागच्या बाजूने सापळा (पिंजरा) लावलेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com