कुळकार देवाचा कळस घरोघरी

उगवे-पेडणे येथील उत्सव: अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम
goa culture
goa cultureDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: उगवे-पेडणे येथील कुळकार देवाचा कळस उत्सव गावागावात फिरून त्याठिकाणी विधिवत पूजा केली जाते. ही संस्कृती टिकवण्यासाठी या उत्सवात बाल गोपाळासह वयोवृद्ध सामील होत असतात. सलग तीन दिवस देवाचा कळस प्रथम देवी माऊली मंदिरकडून जातो. देवाच्या पाच मानकऱ्यांच्या घरी या कळसाचे सुरुवातीला आगमन होते. नंतर गावात घरोघरी फिरून त्याचे विधिवत पूजन केले जाते. ग्रामस्थ या उत्सवात सामील होऊन तो आनंदाने साजरा करतात. तीन दिवस कळस गावात फिरतो. सुरुवातीला रात्रंदिवस कार्य चालू असते. कित्येक वर्षे ही परंपरा सुरू आहे. विशेष म्हणजे भावी पिढीसुद्धा त्यात सहभागी होते.

goa culture
दवर्ली सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव

नवस फेडण्याची प्रथा

जे भाविक कामानिमित्त गावाबाहेर असतात ते या कळस उत्सवासाठी आपल्या घरी येतात. कळस उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्या कळसाचे स्वागत करण्यासाठी घराच्या अंगणात रांगोळ्या घालून, पताका लावून, तोरणे उभारून तयारी केली जाते, नवस बोलले जातात. ते पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी ज्यावेळी पुन्हा कळस घरी येतो, त्यावेळी नवस फेडण्याची प्रथा उगवे गावात आजही प्रसिद्ध आहे.

goa culture
Goa Crime: फ्रॅंकी रॉड्रिग्स यांच्यावर जीवघेणा हल्ला, हात मोडला

पूर्वी कमी लोकवस्ती होती. ठराविक लोक होते त्यांच्या घरी हा कळस जायचा. त्या काळात एका दिवसाचा उत्सव होता. आता तीन दिवस हा उत्सव चालतो. आपण आपल्या बालपणी कळस बघितला. माऊली देवीचा तो उत्सव एका दिवसाचा असायचा. गर्दीही कमी असायची. आज मात्र घरे प्रचंड प्रमाणात वाढली असल्यामुळे कळस घरोघरी जातो. त्यामुळे तीन दिवस हा उत्सव चालतो. होळी आणि रंगपंचमी झाल्यानंतर आठव्या दिवशी हा कळस घरोघरी जातो.

- नारायण महाले, साहित्यिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com