Konkani Official Language Day: गोव्याच्या अस्मितेसाठी कोकणी जपायला हवी; काँग्रेसचे सरकारला आवाहन

कोकणीप्रती प्रेम आणि 555 दिवसांच्या आंदोलनामुळे कोकणीला ओळख मिळण्यास मदत झाली, असे पणजीकर म्हणाले.
Konkani Official Language Day
Konkani Official Language DayDainik Gomantak
Published on
Updated on

Konkani Official Language Day: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी गोंयकारांना राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राजभाषा कोकणी ही अधिकृत कामांसाठी वापरली जावी आणि अनेक व्यासपीठांवरून तिचा प्रचार व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

कोकणीप्रती प्रेम आणि 555 दिवसांच्या आंदोलनामुळे कोकणीला ओळख मिळण्यास मदत झाली, असे पणजीकर म्हणाले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कोकणी राज्यभाषा दिनाच्या शुभेच्छा देत राजभाषेच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी त्वरित पावले उचलण्याचे सरकारला आवाहन केले.

सर्व शासकीय भरतींमध्ये कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य केले जावे आणि शासकीय राजपत्र कोकणीमध्ये प्रकाशित केले जावे अशी मागणी त्यांनी केली.

तर, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्यातील लोकांना प्रथम राजभाषेचा निर्णय घेण्यास मदत केली, जी घटकराज्यासाठी मूलभूत निकष होती. नंतर 4 फेब्रुवारी 1987 रोजी गोवा विधानसभेने राजभाषा विधेयक मंजूर करून कोकणीला गोव्याची राजभाषा बनवले, असे पणजीकर म्हणाले.

राजीव गांधी यांच्या प्रयत्नाने 20 ऑगस्ट 1992 रोजी सत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये कोकणीचा समावेश करण्यात आली. सरकारने गोवा कोकणी अकादमीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करावेत आणि तरुणांना साहित्य निर्मितीसाठी पाठिंबा द्यावा, असे पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com