Madgaon: झिरो कार्बनच्या दिशेने कोकण रेल्वे एक पाऊल पुढे; मडगावसह 'या' स्टेशनवर उभारले सौर पॅनल

मडगाव स्टेशन येथे 180 किलोवॅट क्षमतेचा सौर पॅनेल उभाराला
solar panels
solar panelsDainik Gomantak

भारतीय रेल्वेच्या कोकण झोनने झिरो कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे कार्बन कमी करण्यासाठी विविध झोन अंतर्गत रेल्वे स्थानकांवर सौर पॅनेल बसविण्यात येत आहेत, या पार्श्वभूमीवर मडगाव स्टेशनवर सौर पॅनेल उभारण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.

( konkan railway installed solar panels at madgaon railway station)

मिळालेल्या माहितीनुसार मडगाव स्टेशन येथे 180 किलोवॅट क्षमतेचा सौर पॅनेल उभारण्यात आला आहे. त्यामुळे आता रेल्वे स्टेशनला सामान्य विजेची गरज भासणार नाही. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा हेतू साध्य होऊ शकणार आहे.

solar panels
Vasco: भाडेकरू पडताळणीला वेग; खारीवाडा येथील शंभर जण ताब्यात; घरमालकांचे धाबे दणाणले

भारतीय रेल्वे प्रशासनाने 2030 पर्यंत हळूहळू झिरो कार्बन एमिटर बनण्याची योजना आखली आहे. यात मुख्यत्वेकरून अक्षय ऊर्जा स्रोतांमधून त्याची ऊर्जा मिळवून कार्बन कमी करण्यासाठी म्हणून हे निर्णय घेण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी, कुंडल, सावंतवाडी, चिपळूण, कणकवली, करमाळी, उडुपी, थिवी, मडगाव आणि खेड येथील रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनेल बसवले आहेत.

solar panels
Mopa Airport : 'मोपा'ला पोलिसांचे सुरक्षा कवच; 62 पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे 350 किलोवॅट क्षमतेचा सोलर पार्क बसवले जात आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर 180 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॉवर पॅनल बसवले आहेत. त्याचप्रमाणे कुंडल, सावंतवाडी, चिपळूण, कणकवली, करमाळी, उडुपी, थिविम आणि खेड येथे सौर ऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. यामुळे एकूण 3.42 दशलक्ष युनिट ऊर्जा बचत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com