Pernem News : कोनाडकर खुनानंतर पंचायत, पोलिसांना जाग

Pernem News : गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी भाडेकरूंची माहिती द्या : आर्लेकर
Pernem
Pernem Dainik Gomantak

Pernem News :

पेडणे, ‘गावात वा वाड्यावर जे कोणी भाडेकरू राहतात, त्यांच्याविषयी अर्ज भरून सविस्तर माहिती देण्यासाठी पंचायत सदस्य आणि सरपंचांनी जनजागृती करावी. तसेच हा तपशील ग्रामपंचायतीत ठेवण्याबरोबरच जवळच्या पोलिस ठाण्यातही याची माहिती द्यावी.

यामुळे गुन्हेगारीला आळा घालणे शक्य होईल, असे आवाहन पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.

पेडणे येथील सरकारी विश्रामधामात पेडणे मतदारसंघातील सरपंच व पंचायत सदस्यांसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पेडण्याचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक सचिन लोकरे, नारायण चिमुलकर, पेडण्याचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी उपस्थित होते. पेडणे व मोपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री पेट्रोलिंग करण्यात येते, असे दळवी म्हणाले.

पोलिसांचे कळकळीचे आवाहन

पंचायत, सरपंच, पंचसदस्य यांनी व्हेरिफिकेशन फॉर्मसंबंधी जनजागृती करावी.

दिवसा किंवा रात्री कुठेही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.

माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल.

...तर हा गुन्हा ठरणार

उपअधीक्षक दळवी म्हणाले की, आपल्या घरात किंवा इमारतीत भाडेकरू ठेवताना त्याची माहिती पोलिसांना न देणे हा गुन्हा ठरू शकतो. कायद्याअंतर्गत संबंधितांवर कारवाई होऊ शकते. भाडेकरू ठेवताना व्हेरिफिकेशन फॉर्म भरलाच पाहिजे. हा अर्ज मोफत असून पंचायतीने अशा प्रकारे कुणी आपल्या घरात किंवा इमारतीत भाडेकरू ठेवले आहेत, त्यांचे अर्ज भरावेत.

Pernem
Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

देविदास कोनाडकर यांचा खून होणे, ही एक दुर्दैवी घटना आहे. मोपा विमानतळाचा व्याप पाहता, यापुढेही देशाच्या विविध भागांतून लोक हे येत राहणार आहेत. अशी घटना परत घडू नये, यासाठी घरात किंवा आपल्या इमारतीत भाडेकरू ठेवताना त्याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

- प्रवीण आर्लेकर, आमदार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com