Parra News : केरीतील विद्यार्थी उतरले शेतात

Parra News : धनगरवाडा, केरी येथील प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम
Parra News
Parra News Dainik Gomantak

Parra News : पर्ये, धनगरवाडा केरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतात भेट देऊन शेतीच्या विविध प्रकारच्या माहिती घेतली.

पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी आपल्या पेळावदा येथील शेतात विद्यार्थांना नेऊन विविध प्रकारच्या शेतकामाची माहिती दिली. धडे दिले. सावंत हे दरवर्षी भातशेती, भेंडी, मिरची, भाजीपाला तसेच कंदमुळांची लागवड करतात.

या भेटीवेळी विद्यार्थ्यांना पॉवर ट्रेलरद्वारे जमीन नांगरणी, जमिनीची मशागत आणि भात लावणी याबाबत माहिती दिली.

तसेच सावंत यांनी यावेळी माडावर चडण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. गवत कापणी यंत्र, कीटकनाशके फवारणी पंप यांची प्रात्यक्षिक दाखवली. तसेच शेतीच्या विविध अवजारांची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापिका तृप्ती गांवकर व शिक्षक प्रथमेश चोडणकर उपस्थित होते.

Parra News
Today's Goa News : दिवसभरातील ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर...

मुलांनी अनुभवला मचणावर बसण्याचा आनंद

शेतीची राखण करण्यासाठी सावंत यांनी शेतमळ्यात मचाण उभारले आहे. त्यांनी मुलांना मचाण उभारण्याचे तंत्र आणि त्याचे फायदे मुलांना सांगितले.

यावेळी मुलांनी मचाणावर बसून आनंद लुटला. तसेच काही मुलांनी पॉवर ट्रेलर चालवण्याचा अनुभव घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com