Goa Monsoon 2023 : यंदा सरासरीहून अधिक बरसणार सरी; शास्त्रज्ञांचा अंदाज

राज्यातील धरणे भरली; शेती-शिवारेही लागली बहरू
Goa Monsoon
Goa MonsoonSandip Desai

राज्यात मोठ्या प्रमाणात बरसलेल्या पावसाने यंदा ऑगस्ट महिन्यात १०० इंच पावसाची राज्यात नोंद झाली. वास्तविक जुलैअखेर यंदा पाऊस इंचाची शंभरी गाठण्याच्या मार्गावर होता. पंरतु काही प्रमाणात जुलैच्या शेवटी पावसाने उघडीप दिल्याने ६ ऑगस्ट रोजी पावसाचे इंच शतक पूर्ण झाले. राज्यात सर्वाधिक सांगेत २९५२.२४ (११६.२४इंच) तर सर्वात कमी मुरगावमध्ये २१३१.३ (८३.९० इंच) पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद शक्य असून चिंता नसल्याचा अंदाज एनआयओचे निवृत्त शास्त्रज्ञ एम.आर.रमेशकुमार यांनी व्यक्त केला आहे.

Goa Monsoon
Goa Pwd Department : बांधकाम खात्यातील पदे भरण्याची प्रक्रिया 2 महिन्यांत : नीलेश काब्राल

राज्यातील सरासरी इतका पाऊस पूर्ण झाला आहे. तसेच राज्यातील धरणेदेखील पूर्ण भरली आहेत. तसेच शेतीसाठी देखील हा पाऊस उपयुक्त ठरल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. एम.आर. रमेशकुमार यांच्या मते,राज्यात यंदा सरसरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे.

जरी पाऊस गेले आठ दिवस कमी प्रमाणात पडत असला तरीही आता सरसरी एवढा पाऊस पडला आहे. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस निश्‍चितपणे पडणार असल्याने पुढील ५४ दिवसांत राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडेल यंदा राज्यात सरासरीहून अधिक पाऊस होईल, त्यामुळे चिंता करण्याचे कोणतेच कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

Goa Monsoon
Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात एकूण 2,77,066 रेशनकार्डधारकांची नोंद : रवी नाईक

"यंदा राज्यात जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. परंतु सुदैवाने त्याचे दुष्परिणाम शेतीवर झालेले नाहीत. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले नाही. राज्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी दिवसातून एक-दोनदा पाऊस पडतोच हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त आहे. यंदा केवळ पावसाला काही प्रमाणात उशीर झाल्याने शेतकऱ्यांची पेरणी लांबली परंतु शेतीवर कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही."

- नेव्हील आल्फान्सो, कृषी संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com