पणजी: भारतातील पहिले सेक्स टॉय स्टोअर फेब्रुवारीमध्ये गोवा मधील कलंगुटमध्ये ओपन करण्यात आले होते. मागिल काही दिवसात या शॉप चा भरपूर प्रमाणात प्रचार झाला. परंतु या शॉपला एका महिन्याच्या आत कंपनीकडे परवाना नसल्याने बंद करण्यास सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील पंचायतीने परवान्याअभावी स्टोअरचे कामकाज बंद करण्यास सांगितले. तसेच लोकांनी स्टोअरबाबत काही समस्या किंवा तक्रारी सुद्धा केल्या.
कामाकार्ट आणि गिझ्मोसवाला यांच्या भागीदारीत कामा गिझ्मोस, सेक्स टॉय आणि वेलनेस स्टोअर सुरू केले होते. कामाकार्ट हे दक्षिण भारतात लैंगिक कल्याण स्टोअर्सची साखळी चालवित आहेत, तर गिझमोस्वाला हे मुंबईबाहेरील एक ऑनलाइन सेक्स टॉय स्टोअर आहे.
“आमची ट्रेड परवाना अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. पण आम्हाला परिसरातीन पंचायतीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की शनिवारी (13 मार्च) काही दिवस दुकान उघडू नका म्हणून आम्ही ते बंद ठेवले. आमच्यावर स्थानिक प्राधिकरणाकडून खूप दबाव होता. आम्ही गोव्याचे नसल्याने आम्हाला स्थानिक पातळीवर लक्ष्य करण्यात आले," असे कामकार्टचे मुख्य कार्यकारी प्रवीण गणेश यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.