Yuri Alemao: बंडखोर आमदारांना जनता धडा शिकवणार! गाव विकण्यापासून रोखण्याची गरज; आलेमाव यांचे आवाहन

Goa Politics: कुडतरी मतदारसंघात गटार बांधकामाचे उद्‍घाटन केल्यानंतर आलेमाव बोलत होते. यावेळी सरपंच आग्नेलो डिकोस्ता, पंच सदस्य टोनी रापोझ, मोरेनो रिबेलो उपस्थित होत्या.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomanatak
Published on
Updated on

मडगाव: भाजप सरकार गोव्यातील जमिनी खासगी विद्यापीठे आणि भांडवलदार मित्रांना विकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले.

कुडतरी मतदारसंघात गटार बांधकामाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सरपंच आग्नेलो डिकोस्ता, पंच सदस्य टोनी रापोझ, मोरेनो रिबेलो उपस्थित होत्या.

कुडतरी मतदारसंघातील माकाझान येथील मुख्य रस्त्यालगत डोमिंगो रापोज घर ते जुन्या खुरीसपर्यंत गटाराचे काम हाती घेतल्याबद्दल जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती मिशेल मोरेनो रिबेलो यांचे युरी आलेमाव यांनी कौतुक केले. ‘झाडे तोडून आणि पर्यावरणाला बाधा पोहोचवून आपल्या नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास करणाऱ्यांना आमचे गाव विकण्यापासून आम्ही रोखायला हवे. थिवी आणि गोव्यातील इतर ठिकाणी काही खासगी विद्यापीठांना जमीन उपलब्ध करून देण्याच्या तयारीत भाजप सरकार असल्याने आम्हाला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे,’ असे युरी आलेमाव म्हणाले.

भविष्यात आमदारांचा घोडेबाजार करून सरकार स्थापन करता येणार नाही, याची भाजपला जाणीव आहे आणि म्हणूनच ते जमेल तेवढी लूट करत आहेत, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

‘बंडखोर आमदारांना जनता धडा शिकवणार’

पक्षांतर केलेल्या आमदारांना पुढील विधानसभा निवडणुकीत घरी पाठवण्याचा निर्णय गोव्यातील जनतेने घेतला आहे. यासाठी वैफल्यग्रस्त झालेला भाजप शक्य तितकी लूट करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

Yuri Alemao
Yuri Alemao: भाजप सरकार अपयशी! गोव्याला दलाल संस्कृती, गुन्ह्यांचे केंद्र बनवले; आलेमाव यांचा घणाघात

‘शांतता बिघडवण्याचा सरकारचा प्रयत्न’

आलेमाव म्हणाले, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस २७ जागांचा टप्पा पार करेल. भाजप राजकीय फायद्यासाठी गोव्यातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी गटार बांधणे महत्त्वाचे आहे, लोकांना विश्वासात घेऊन हे काम करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com