Bicholim News: डिचोलीत कोमुनिदाद जागेवर बेकायदा झोपडपट्टी! बहुतांश रहिवासी परप्रांतीय; अनेकांनी बांधली पक्की घरे

Bicholim IDC Illegal slum: डिचोली शहर ‘झोपडपट्टी’मुक्त झाल्याचे चित्र असले, तरी शहरापासून जवळच असलेल्या ‘आयडीसी’ परिसरात बेकायदा झोपडपट्टी उभी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
Bicholim IDC Illegal slum: डिचोली शहर ‘झोपडपट्टी’मुक्त झाल्याचे चित्र असले, तरी शहरापासून जवळच असलेल्या ‘आयडीसी’ परिसरात बेकायदा झोपडपट्टी उभी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
Bicholim IDC Illegal slumDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim IDC Illegal slum

डिचोली: डिचोली शहर ‘झोपडपट्टी’मुक्त झाल्याचे चित्र असले, तरी शहरापासून जवळच असलेल्या ‘आयडीसी’ परिसरात बेकायदा झोपडपट्टी उभी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

कोमुनिदाद जागेत उभ्या राहिलेल्या या झोपडपट्टीत राहणारे बहुतांश परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील विविध भागात बेकायदेशीर झोपडपट्ट्यांचा मुद्दा गाजत आहे. बेकायदेशीर उभ्या राहिलेल्या झोपड्या जमीनदोस्तही करण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात डिचोली शहरातही झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली आहे.

मजुरी वा अन्य कामधंद्यानिमित्त डिचोली शहरात परप्रांतीयांचा आकडा वाढला असला, तरी अधिकाधिक परप्रांतीय भाड्याच्या खोल्यांनी राहत आहेत. वीस वर्षांहून अधिक काळापासून शहरात वास्तव्यास असलेल्या अनेकांनी तर भूखंड विकत घेऊन घरेही बांधली आहेत. आयडीसी परिसरातील कोमुनिदाद जागेत काही झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. या झोपड्या बेकायदा असल्या, तरी त्याविरोधात कोणाचीही तक्रार नाही.

मजुरी वा अन्य कामधंद्यानिमित्त डिचोली शहरात सध्याच्या घडीस दोन ते अडीच हजार परप्रांतीय वास्तव्यास आहेत.

Bicholim IDC Illegal slum: डिचोली शहर ‘झोपडपट्टी’मुक्त झाल्याचे चित्र असले, तरी शहरापासून जवळच असलेल्या ‘आयडीसी’ परिसरात बेकायदा झोपडपट्टी उभी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
Vasco Crime: वास्‍को खून प्रकरणात संशयिताला दणका! न्‍यायालयाकडून जामीन रद्द; कृत्‍य जाणूनबुजून केल्‍याचा ठपका

झोपडपट्टी जमीनदोस्त

शहरातील बसस्थानकापासून जवळच ‘पिराची कोंड’ भागात एक बेकायदेशीर झोपडपट्टी उभारण्यात आली होती. या झोपडपट्टीचा वाद न्यायप्रविष्ट बनला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या सप्टेंबर महिन्याच्या २० तारखेला ही बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत जवळपास १० झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com