Mandrem News : मांद्रेत डोंगर भागात बेकायदा रस्ता; सरपंच आश्चर्यचकित

Mandrem News : पंचायत क्षेत्रात अशा बेकायदा कृत्यांना थारा देणार नाही, असे नाईक यांनी म्हटले आहे.
Mandrem
Mandrem Dainik Gomantak

Mandrem News :

मोरजी, मांद्रे-आगारवाडा सीमेजवळ मांद्रे पंचायत क्षेत्रातील आस्कावाडा बोडगेधेनू येथून डोंगरावर जाण्यासाठी काढलेला सुमारे ४ किलोमीटर बेकायदा रस्ता तसेच डोंगरावर सुरू असलेले बांधकाम व डोंगर कापणी याबाबत सरपंच प्रशांत नाईक यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

पंचायत क्षेत्रात अशा बेकायदा कृत्यांना थारा देणार नाही, असे नाईक यांनी म्हटले आहे.

या बांधकामाबाबत स्थानिकांनी पंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी स्थानिक पंच तथा उपसरपंच तारा हडफडकर, सचिव, तक्रारदार यशवंत सावंत व स्थानिकांसमवेत आपण प्रत्यक्ष पाहणी केली असता बेकायदा रस्ता तयार करून डोंगर कापणी तसेच बांधकाम सुरू असल्याचे दिसून आले, असे नाईक यांनी सांगितले.

सरपंच नाईक यांनी सांगितले की, येथे प्रवेश करताना सुरक्षारक्षकांनी आपल्या अडवले व सरपंच असल्याचा पुरावा मागितला. आज स्थानिकांना आपल्याच भागात फिरणे धोकादायक बनत आहे, असे ते म्हणाले.

Mandrem
Goa Congress: दु:खी नाही पण नाराज! उमेदवारी न मिळाल्याने फ्रान्सिस सार्दिन बंडखोरीच्या तयारीत?

उपसरपंच तारा हडफडकर यांनी सांगितले की, यापूर्वी येथे पाहण्यासाठी गेलो असता सुरक्षारक्षकांनी आम्हा महिलांना अडविले होते.महिलांना आज या भागात जाणे धोकादायक झाले आहे. येथे जवळच वटवृक्ष आहे. त्याची स्थानिक पूजा करतात. तेथे जाणे देखील आज कठीण झाले आहे.

रस्ता मांद्रेत, बांधकाम मोरजीत

तक्रारदार यशवंत सावंत यांनी सांगितले की, जानेवारीत उपसरपंचांनी नावासहीत तक्रार केली होती, परंतु तत्कालीन सरपंच अमित सावंत यांनी अज्ञात व्यक्तीच्या नावे नोटीस काढल्याने त्यांना आत जाऊ दिले नव्हते.

त्यानंतर अचानक ग्रामसभेची नोटीस लावल्याने जानेवारीत झालेल्या ग्रामसभेत हा विषय मांडण्याची संधी स्थानिकांना मिळाली नाही, त्यामुळे येथे नेमके काय सुरु आहे, याची माहिती मिळाली नाही. दरम्यान, मांद्रे पंचायत क्षेत्रातून रस्ता करून त्याचा वापर मोरजी पंचायत क्षेत्रात असलेल्या बांधकामासाठी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com