Mapusa Fire News: म्हापशातील आंगोड येथील घराला आग; 60 हजारांचे नुकसान

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे
Mapusa Fire News
Mapusa Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Fire News

म्हापशातील आंगोड येथील कृष्ण मंदिराजवळ असलेल्या शेखर गावस यांच्या घराला आग लागली. सदर घटना काल (ता. 5) रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. आगीची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. माहितीनुसार, यामध्ये एकूण 60 हजारांचे नुकसान झाले. यात कपडे, भांडी, पुस्तके तसेच घरातील इतर साहित्य जळाले. मात्र तब्बल 1 लाखाची मालमत्ता वाचवण्यात दलाच्या जवानांना यश आले.

दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. म्हापसा अग्निशमन दलाचे सुरज शेटगावकर, गोविंद देसाई, तेजस बांदेकर, प्रवीण गावकर, अक्षय सावंत हे जवान या बचावकार्यात सहभागी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com