Colva: अमानुषतेची आणखी एक घटना; कोलवा येथे पाळीव कुत्र्यावर ओतले उकळलेले पाणी

साकोर्डा - धारबांदोडा येथे शिकारीसाठी पेरलेल्या गावठी बाँबच्या स्फोटात काल रानडुक्कराचे तोंड फुटून जखमी होण्याची घटना घडली होती.
Colva
Colva
Published on
Updated on

Colva: जंगली प्राण्याच्या शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बाँबचा स्फोट होऊन एका रानटी डुकराचे तोंड फुटल्याची घटना ताजी असतानाच कोलवा येथील एका पाळीव कुत्र्यावर अज्ञाताने उकळलेले पाणी ओतण्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेमुळे कुत्रा भाजून गंभीर जखमी झाला असून त्याच्या अंगावरील चामडी अक्षरशः लोंबकळत आहे. या अमानुष कृत्य करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध कोलवा परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत पाळीव कुत्र्यावर गरम पाणी ओतण्याचा हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी फिडोल नामक महिलेने कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कुत्र्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले.

साकोर्डा - धारबांदोडा येथे शिकारीसाठी पेरलेल्या गावठी बाँबच्या स्फोटात काल रानडुक्कराचे तोंड फुटून जखमी होण्याची घटना घडली होती. त्यानंतर आज कोलवा येथे पाळीव कुत्र्यावर उकळलेले पाणी ओतण्याचा प्रकार घडला आहे.

यामुळे प्राणीप्रेमींत हळहळ व्यक्त केली जात आहे. माणसाकडून पाळीव प्राणी व जंगली प्राण्यांवर होणारे हे हल्ले निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com