Fatorda
FatordaDainik Gomantak

Fatorda News : फातोर्डा येथील वारसा स्थळांचा विकास करणार : विजय सरदेसाई

Fatorda News :जुन्या बाजारातील ‘हायमास्ट’चे उद्‍घाटन, जुन्या बाजारातील विकासकामेही सध्या चालू आहेत

Fatorda News :

सासष्टी, फातोर्ड्यातील सर्व वारसा स्थळांचा विकास केला जाणार आहे, अशी माहिती फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज दिली.

जुन्या बाजारात १० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘हायमास्ट’चे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते.

जुना बाजार हे मडगावातील वारसा स्थळ आहे. याचे महत्त्व ठेवून परिसराचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न असेल. स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले होते. हा निधी वापरण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.

फातोर्डा इतर महत्वाच्या ठिकाणी आणखी तीन हायमास्ट उभारले जातील. हे हायमास्ट पर्यटन खात्यामार्फत उभारण्यात येणार असून त्याची देखभालही पर्यटन खाते करील, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Fatorda
Goa Student: वृत्तपत्र वाचनामुळे मुलांचा चौफेर विकास

जुन्या बाजारातील विकासकामेही सध्या चालू आहेत. कोणी तरी या कामाच्या विरोधात तक्रार केल्याने हे काम कंत्राटदाराने बंद केले, पण कंत्राटदाराला परवानगी असलेले काम बंद करण्याचा अधिकार नाही. सोमवारपासून हे काम परत सुरू केले जाईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.

सध्या जुन्या बाजारात १.३० कोटी खर्चून मलनिःसारन वाहिनीचे काम सुरू आहे. जुना बाजार, कोलवा सर्कल ते रिंग रोडपर्यंत हे काम बाकी होते. ही सिवरेजची लाईन फातोर्ड्यातील सिवरेजच्या मुख्य उत्तर लाईनला जोडली जाईल, असे त्यानी सांगितले. याप्रसंगी गोवा फॉरवर्डचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com