Goa Court: आमदार आरोलकर यांच्यावरील जमिन हडप प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला...

एकसदस्यीय चौकशी आयोगासमोर १ मार्च रोजी सुनावणी
Jeet Arolkar
Jeet ArolkarDainik Gomantak

Goa Court: धारगळ येथील जमीन हडप केल्याप्रकरणी दाखल केलेली तक्रार (एफआयआर) रद्द करण्यासाठी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली होती.

त्यावरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निर्णय राखून ठेवण्यात आला. सध्या याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे व एकसदस्य आयोगासमोर ही सुनावणी येत्या 1 मार्चला ठेवण्यात आली आहे.

(Mandrem MLA Jeet Arolkar)

Jeet Arolkar
Manoj Parab: हाच का सत्तरीतील खरा विकास? मनोज परब यांची राणेंच्या घराणेशाहीवर टीका...

मांद्रेचे आमदार आरोलकर यांनी धारगळ येथील सुमारे 1.48 लाख चौ. मी. जमीन हडप केल्याची तक्रार अमेरिकास्थित म्हापसा येथील रवळू खलप यांनी दाखल केली आहे. ज्या जमिनीचे भूखंड करून त्याची विक्री आरोलकर यांनी केली आहे त्याचा तो सहमालक असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

ही तक्रार पेडणे पोलिसांत दाखल झाली होती मात्र जमीन हडप प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केल्यापासून ती या पथकाकडे वर्ग केली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी आरोलकर यांनी न्यायालयात याचिका सादर केली होती.

या याचिकेच्या सुनावणीवेळी गोवा खंडपीठाला या प्रकरणातील तपासकामाचा अहवाल बंद लिफाफ्यात सादर करण्यात आला होता. आज या याचिकेवर जीत आरोलकर तसेच तक्रारदार खलप यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवण्यात येत असल्याचे खंडपीठाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com