Harmal News : हरमलात जनतेची कामे रेंगाळली; नियोजित कामात सचिव व्यस्त

Harmal News : अतिरिक्त सचिवांच्या नियुक्तीची मागणी
Harmal
HarmalDainik Gomantak

Harmal News :

हरमल पंचायत क्षेत्रातील जनतेची अनेक कामे पूर्णत: रेंगाळली असून, पंचायत सचिव सीआरझेड व अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याने ग्रामस्थांचे हेलपाटे वाढू लागले आहेत. परिणामी सरकारने अतिरिक्त सचिवाची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पेडणे गटविकास अधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांनी हरमल पंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी

होत आहे.

पंचायत क्षेत्रातील वार्षिक सोपो पावणी ८ लाख रुपयांना झाल्याने नागरिकांनी समाधान

व्यक्त केले. यंदाच्या हंगामात सोपो पावणी विक्रमी ८ लाख रुपयांना गेल्याचे सचिव सुभाष कांबळी यांनी सांगितले. या पावणीवेळी तब्बल २२ जणांनी इच्छुक म्हणून तयारी दाखवली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावणी नऊपटीने अधिक गेल्याचे सांगण्यात आले.

शासकीय अधिकाऱ्यांची ऊठबस :

गेले तीन-चार महिने हरमल पंचायत क्षेत्रात सीआरझेड, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांची ऊठबस सुरू आहे.

हायकोर्ट व अन्य अधिकाऱ्यांना आवश्यक दस्तावेज देणे, तसेच अधिकाऱ्यांच्या सेवेमुळे पंचायत सचिव पूर्णत: व्यस्त असल्याने कार्यालयीन कामे पूर्ण करणे कठीण झाले आहे. कित्येकांचे ना हरकत दाखले तसेच अन्य प्रमाणपत्रे रखडली असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Harmal
Goa Weather Update: गोव्यात सोमवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता; तापमानाचा पारा 33.5 अंशांवर

रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण

या भागातील मासळी मार्केट स्वच्छ ठेवण्यासाठी पंचायतीने कर्मचारी नेमावा किंवा येथील व्यावसायिकांना ताकीद द्यावी, तसेच संबंधित कर्मचाऱ्याला पगारवाढ देऊन मार्केटमध्ये घाण व दुर्गंधी येणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच तिठा भागात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना एकाच जागी बसवावे, अशी सूचनाही ग्रामस्थांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com