Goa Police आयोजित हॅकेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न!

महाविद्यालयाच्या वास्तूत चाललेल्या या दोन दिवसीय स्पर्धा उपक्रमाची सांगता काल झाली.
Hackathon Competition
Hackathon Competition Dainik Gomantak

Hackathon Competition: हॅकर्सची ताकद एवढी वाढली आहे की, एका जागी बसून कोणतीही माहिती गायब करण्याचा प्रकार घडू शकतो. देशाच्या सुरक्षा यंत्रणेत काम करताना आम्ही मिसाईल जरी बनविल्या तरी बसल्या जाग्यावरून माहिती गायब करण्याचा धोका असल्याने, अशा धोकेबाजांना धडा शिकविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर व्हायला हवा, असे उद्‌गार ‘मिसाईल वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. टेसी थॉमस यांनी काढले.

इतर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचा धोका अधिक असल्याने त्यावर मात करण्यासाठी आपण वावरले पाहिजे, असेही टेसी थॉमस यांनी नमूद केले. फर्मागुडी-फोंडा येथे गोवा पोलिसांतर्फे ‘हॅकेथॉन 2022’ या तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, बिट्‌स पिलानी तसेच अन्य तंत्रज्ञान महाविद्यालयांतील मिळून एकूण 53 विद्यार्थी सहभागी झाले होते.

फर्मागुडीतील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वास्तूत चाललेल्या या दोन दिवसीय स्पर्धा उपक्रमाची सांगता आज सोमवारी झाली. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. थॉमस यांच्यासमवेत राज्याचे मुख्य सचिव पुनित गोयल, गोवा पोलिस महासंचालक जसपाल सिंग, आयआयटी गोवा प्रमुख बी. के. मिश्रा व मान्‍यवर उपस्‍थित होते.

Hackathon Competition
CM Pramod Sawant| सुवर्णमहोत्सवी निधीचा वापरच नाही

डॉ. टेसी थॉमस: विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टी जर एकत्र वावरल्या तर देशासाठी ते सकारात्मक ठरेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानातून नवनवीन उपक्रम साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे. सायबर गुन्ह्यांचा धोका वाढल्याने त्यावर मात करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर व्हायला हवा. पूर्वीच्या काळी साधनसुविधा नसतानाही अभियांत्रिकी शिक्षणातून अनेकांनी मोठे शोध लावले, तंत्रज्ञान विकसित केले. आजच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांना नवनवीन शोध लावण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com