Margao News: 'मडगाव विकास' आराखडा लोकांसाठी उपलब्ध करावा! ‘गोंयच्या फुडले पिळगे खातीर’ची मागणी

Margao Development Plan: मडगाव विकास आराखड्यास अंतिम रूप देण्यात आले असेल तर तो आराखडा लोकांसाठी उपलब्ध करावा, अशी मागणी ‘गोंयच्या फुडले पिळगे खातीर’ या संस्थेने केली आहे.
Development Plan
Development PlanCanva
Published on
Updated on

सासष्टी: जेव्हापासून मडगावचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून हा आराखडा या ना त्या कारणाने चर्चेतच आहे. आराखडा तयार करण्यात आला तेव्हा अवघ्याच लोकांना दाखविण्यात आला. बंद दरवाजामागे त्याची चर्चा झाली. जर त्‍यास अंतिम रूप देण्यात आले असेल तर तो आराखडा लोकांसाठी उपलब्ध करावा, अशी मागणी ‘गोंयच्या फुडले पिळगे खातीर’ या संस्थेने केली आहे.

सदर आराखड्याची पारदर्शकता जपण्यासाठी लोकांना चर्चेत सहभागी करून घ्या. जर या आराखड्याची अंमलबजावणी सुरू झाली तर त्याचा मडगाव शहरावर पर्यावरणीय दृष्टीने काय परिणाम होणार याची माहिती लोकांसमोर मांडणे आवश्यक असल्याचे या संस्थेचे मत आहे.

Development Plan
Margao News: मडगाव न्यू मार्केटमधले बेकायदा प्रकार थांबवा! असोसिएशनकडून चिंता व्यक्त; पालिकेचे दुर्लक्ष

हा आराखडा लोकांना दाखविण्यात आलेला नाही. लोकांच्या सूचनांचा विचार केला आहे की नाही याचीही स्पष्टता नाही, त्यामुळे या आराखड्याबद्दल लोकांच्या संभ्रम आहे, असेही संस्थेने म्‍हटले आहे.

संस्थेचे अध्यक्ष जॅक मास्कारेन्हस यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही आराखड्यासंदर्भात प्रक्रियेतील त्रुटी स्पष्ट केल्या आहेत. लोकांना विश्वासात न घेता हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com